जिल्हा सामान्य रूग्णालयातील प्रसुती कक्षात शिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 12:00 PM2020-09-13T12:00:25+5:302020-09-13T12:00:34+5:30
शुक्रवारी सांयकाळी झालेल्या दमदार पावसामुळे आरोग्य विभागाचे पुन्हा एकदा पितळ उघडे पडले.
बुलडाणा: जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्यानेच बांधण्यात आलेल्या इमारतीमधील प्रसुती कक्षात ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावसाचे पाणी शिरल्याने कक्षातील गर्भवती महिलांसह रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.
यंदाच्या पावसाळ््यात दुसऱ्यांदा हा प्रकार घडला. मात्र याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. एरवीही रुग्णालयातील वरच्या छतावरील पाणी हे खालील कक्षात टपकत असल्याची ओरड रुग्णालयातील कर्मचारी करीत असतात. मात्र शुक्रवारी सांयकाळी झालेल्या दमदार पावसामुळे आरोग्य विभागाचे पुन्हा एकदा पितळ उघडे पडले. सुदैवाने या दरम्यान कुठलाही अनुचीत प्रकार घडला नाही. मात्र रुग्णालयातील कर्मचाºयांना, परिचारिकांना पायात प्लास्टीकच्या पिशव्या घालून काम करावे लागल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. त्यामुळे यावर कायमस्वरुपी तोडगा काढणे आवश्यक झाले आहे. या पावसाळ्यात दुसºयांदा असा प्रकार घडला आहे.