उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच बुलढाण्यात पाणीटंचाइचे संकट, पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम अर्धवट
By विवेक चांदुरकर | Published: April 7, 2024 02:20 PM2024-04-07T14:20:48+5:302024-04-07T14:21:32+5:30
आदिवासी भागातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती
विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव जि. बुलढाणा: जळगाव जामोद तालुक्यातील उमापूरसह आजूबाजूच्या गावांमध्ये आदिवासी गावांमध्ये पाणीपूरवठा करण्याकरिता पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र बांधकाम अर्धवटस`थितीत थांबविण्यात आले आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील गावांमध्ये आदिवासी बांधवांची लोकसंख्या अधिक आहे. या गावांमध्ये नागरिकांना पाणीपूरवठा करण्याकरिता पाण्याच्या टाक्यांच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आली. मात्र, पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम अर्धवट आहे.
उन्हाळ्याला सुरूवात झाली असली तरी अद्याप पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देवून तत्काळ पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राजूरा धरणात अल्प जलसाठा
जळगाव जामोद तालुक्यात असलेल्या राजूरा धरणात अल्प जलसाठा आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच अल्प जलसाठा असल्याने आगामी उन्हाळ्यात तलाव सुकण्याची शक्यता आहे. या धरणात जंगलातील वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी येतात. धरणातील पाणी सुकल्यास वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.