नांदुरा तालुक्यातील १२ गावात आतापासूनच पाणीटंचाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:09 AM2018-02-26T01:09:41+5:302018-02-26T01:09:41+5:30

नांदुरा: फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच तालुक्यातील गावांना आ तापासूनच तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षी पेक्षा भीषण पाणीटंचाई यावर्षी तालुक्यात राहणार असून, प्रशासनाने  सजग राहण्याची आवश्यकता आहे.

Water shortage from today in 12 villages of Nandura taluka | नांदुरा तालुक्यातील १२ गावात आतापासूनच पाणीटंचाई 

नांदुरा तालुक्यातील १२ गावात आतापासूनच पाणीटंचाई 

Next
ठळक मुद्देफेब्रुवारीच्या अखेरीसच पाण्यासाठी भटकंती! 

संदीप गावंडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा: फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच तालुक्यातील गावांना आतापासूनच तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षी पेक्षा भीषण पाणीटंचाई यावर्षी तालुक्यात राहणार असून, प्रशासनाने  सजग राहण्याची आवश्यकता आहे.
नांदुरा तालुक्यातील बहुतांश गावामध्ये विहीर बोअरवेलच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येतो. काही गावांना पूर्णामायचा आधार आहे. दरवर्षी  घटणार्‍या भूजल पातळीमुळे विहीर किंवा बोअरवेल बाराही महीने  पाणीपुरवठा करण्यास सक्षम नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यात गावाशेजारील  एखाद्या पाणी उपलब्ध असणार्‍या शेतकर्‍यांच्या शेतातील विहीरी व  बोअरवेलचे अधिग्रहण करून गावाला पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु  यावर्षी भूजल पातळीत झालेल्या लक्षणीय घटीमुळे पाणी मिळणे कठीण  झाले आहे. मागील वर्षी तालुक्यातील २३ गावामध्ये २४ ठिकाणी  अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात आला होता; मात्र यावर्षी  जानेवारीतच १२ गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत  असून, मार्चमध्ये अध्र्याधिक तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा बसण्याची  शक्यता आहे. पंचायत समितीमार्फत ८ गावांचे अधिग्रहणाचे प्रस्ताव  तहसील कार्यालयाकडे तर ४ गावचे प्रस्ताव ग्रामीण पाणीपुरवठा  विभागाकडे परवानगीसाठी पाठविले असून, तहसील कार्यालयाने आता पर्यंत ५ गावांना अधिग्रहणासाठी परवानगी दिली आहे.

या गावात पाणीटंचाईची झळ
नांदुरा तालुक्यातील सिरसोडी, काटी, हिंगणे गव्हाड,. मामूलवाडी,  माळेगाव, पिंपळखुटा, विटाळी, शेलगाव, आंबोड.ा, चांदुर बिस्वा,  खेडा, मोमिनाबाद, नवे खेडगाव येथे भीषण पाणीटंचाईचा सामना  करावा लागणार असण्याची शक्यता आहे.

Web Title: Water shortage from today in 12 villages of Nandura taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.