पाणीटंचाई कृती आराखडा
By admin | Published: December 31, 2014 12:21 AM2014-12-31T00:21:52+5:302014-12-31T00:21:52+5:30
खामगाव तालुक्यात पहिल्या टप्प्यात ५८ तर दुस-या टप्प्यात ४४ गावांचा कृतिआराखड्यात समावेश.
खामगाव (बुलडाणा) : येत्या उन्हाळ्यात उद्भवणार्या पाणीटंचाई निवारणार्थ खामगाव पंचायत समितीने उपाय योजना आखल्या असून, पंचायत समिती प्रशासन पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहे.
खामगाव तालुक्यात ९६ ग्रामपंचायती असून, १४७ गावे आहेत. यापैकी १२ गावे उजाड आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन विविध उपाय योजना राबवित असतो. यावर्षी अत्यल्प पावसाळा झाल्याने सद्यस्थितीत पाणी पातळी खाली गेली आहे, त्यामुळे यंदाचा उन्हाळा चांगलाच आठवणार आहे. पाणीटंचाईसदृश गावांना तर चांगलेच चटके सहन करावे लागतील. येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्यावर तत्काळ उपाययोजना म्हणून पंचायत समिती प्रशासनाने ६ महिन्यांचा कृती आराखडा तयार केला आहे.
माहे जानेवारी-मार्च २0१५ दरम्यान तालुक्यातील अंबिकापूर, अंत्रज, बोजरवळा, बेलखेड, बेलुरा, धापटी, ज्ञानगंगापूर, जयपूर लांडे, जनुना, हिवरखेड, खुटपुरी, हिवरा खुर्द, घाटपुरी, कंझारा, लांजुड, लासुरा जा., लाखनवाडा बु., लोणी गुरव, कोक्ता, माक्ता, मांडका, गेरु माटरगाव, नायदेवी, निरोउ, पिंप्राळा, पोरज, रोहणा, राहुड, शिरसगाव दे., शिराळा, झोडगा, नागझरी बु., नागझरी खु., ढोरपगाव, श्रीधर नगर या गावांमध्ये टंचाई निवारणार्थ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत.
तर एप्रिल ते जून दरम्यान तालुक्यातील अडगाव, अटाळी, आवार, भंडारी, तरोडा नाथ, बोरी, दधम, गारडगाव, घाणेगाव, गोंधनापूर, जळका भडंग, जळका तेली, काळेगाव, कारेगाव बु., कोंटी, गेरु, लोखंडा, माक्ता, निमकवळा, पाळा, पळशी खुर्द, पिंप्राळा, पिंप्री गवळी, शहापूर, सुजातपूर, सुटाळा बु., सुटाळा खुर्द, वाडी, कुर्हा, वरणा व वझर, या गावांचा समावेश आहे.