दुष्काळात फुटला पैनगंगा नदीपात्राला पाझर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 06:07 PM2019-04-13T18:07:45+5:302019-04-13T18:08:39+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. मात्र या दुष्काळातही पैनगंगा नदीपात्राला पाझर फुटल्याचे चित्र बुलडाणा तालुक्यातील साखळी बु. परिसरात पाहावयास मिळाले आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. मात्र या दुष्काळातही पैनगंगा नदीपात्राला पाझर फुटल्याचे चित्र बुलडाणा तालुक्यातील साखळी बु. परिसरात पाहावयास मिळाले आहे. नदी खोलीकरणामुळे भर उन्हाळ्याच्या दिवसात पाणी लागले आहे. परिणामस्वरूप परिसरातील हजारो गुरांची तहान या पाण्यावर भागविली जात आहे.
बुलडाणा तालुक्यातील साखळी बु. शिवारातून गेलेली नदी समोर पैनगंगा या मुख्य नदीला मिळते. त्यामुळे साखळी बु. शिवारातील नदीला पैनगंगा नावानेच ओळखले जात. या नदी खोलिकरणाचे काम भारतीय जैन संघटना, मृद व जलसंधारण विभाग बुलडाणा आणि साखळी बु. ग्रामपंचायतच्यावतीने १४ डिसेंबर २०१८ पासून सुरू करण्यात आले आहे. भर उन्हाळ्याच्या दिवसात या नदीपात्रात पाणी लागले आहे.
जलपूजनाने केला आनंदोत्सव साजरा
कोरड्या पडलेल्या नदीपात्राला खोलीकरणामुळे पाणी लागताच साखळी बु. ग्रामस्थांनी व परिसरातील शेतकºयांनी जलपूजन करून आनंदोत्सव साजरा केला. सरपंच विजयाताई अनिल कोळसे यांच्याहस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी उपस्थित होते. ग्रामपंचायतच्या पुढाकाराने झालेल्या या कामामुळे काम मुक्या प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. परिसरात गुरांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. मात्र या पाण्यामुळे पशुपालकांना मोठा आधार झाला आहे.
मुरूमाचा फायदा
शेतरस्ते बनविण्यासाठी नदीपात्रातील मुरूमाचा फायदा झाला. साखळी खु. शिवारातील शेतरस्ते बनविण्यासाठी नदी खोलीकरणातून निघालेल्या मुरूमाचा वापर करण्यात आला.
दीड कि़मी. सिंचन
शेतकºयांना शेतीतील सिंचनासाठी या नदीखोलीकरणाचा फायदा होणार आहे. जवळपास दीड कि़मी.पर्यंत शेतकºयांसाठी हे खोलीकरण सिंचनासाठी संजिवनी ठरणारे आहे.