बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा पोहोचला १६३ दलघमीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 02:16 PM2019-08-11T14:16:53+5:302019-08-11T14:17:04+5:30
प्रकल्पांमध्ये तब्बल १६३.३३ दलघमी पाणीसाठा निर्माण झाल्याने उन्हाळ््यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता निकाली निघाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात पावसाने यंदा दमदार हजेरी लावलेली असली तरी प्रकल्पांमध्ये मात्र अपेक्षीत जलसाठा न झाल्याने जिल्ह्यातील २५ लाख लोकसंख्येचा उन्हाळ््यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटणार अशी चिंता लागून होती. मात्र दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये तब्बल १६३.३३ दलघमी पाणीसाठा निर्माण झाल्याने उन्हाळ््यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता निकाली निघाला आहे.
त्यामुळे एक प्रकारे जिल्हासियांची उन्हाळ््यातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटल्यात जमा झाली आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ३१ टक्के पाणीसाठा उपल्बध झाला आहे. दरम्यान, दोन दिवस संततधार पाऊस झाल्यामुळे सध्या नदी, नाले, ओढ्यांना बऱ्यापैकी पुर जात असल्याने ९१ प्रकल्पांमध्ये जलसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. खामगाव शहरास पाणीपुरवठा करणाºया ज्ञानगंगा प्रकल्पामध्येही ७० टक्के पाणीसाठा झाल्याने खामगावकरांना उन्हाळ््यात भेडसावणारी पाणीसमस्याही निकाली निघण्यात मदत झाली आहे.
दीड दशकातील भीषण दुष्काळ अनुभवलेल्या बुलडाणा जिल्ह्यात संपलेल्या उन्हाळ््यात गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याची समस्या निर्माण झाली होती. तब्बल ३० योजनांसाठी पाणीआरक्षणच करता आले नव्हते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ््यात प्रकल्पांमध्ये झालेल्या जलसाठ्यावर जिल्ह्यातील नागरिकांचे बारकाईने लक्ष होते. त्यामुळे प्रकल्पांमध्ये संततधार पावसामुळे झालेला जलसाठा पाहता जिल्हावासियांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.
खडकपूर्णा प्रकल्पामध्येही आवक
खडकपूर्णा प्रकल्पामध्येही पाण्याची आवक सुरू झाली असून प्रकल्पाच्या मृतसाठ्यामध्ये वाढ होत आहे. आज रोजी या प्रकल्पामध्ये १.१५ टीएमसीपर्यंत (३२.६३ दलघमी) हा मृतसाठा पोहोचला आहे. मजेशीर बाब म्हणजे बुलडाणा शहरास पाणीपुरवठा करणाºया येळगाव धरणात उपलब्ध असलेल्या जलसाठ्याच्या दुप्पट पाणीसाठा सध्या खडकपूर्णा प्रकल्पामध्ये आहे. दुसरीकडे उन्हाळ््यातील चार महिन्याचा विचार करता जिल्ह्याला जवळपास ४० दलघमी पाण्याची गरज असते.