मेहकर शहराला १३ व्या दिवशी पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:46 AM2021-06-16T04:46:29+5:302021-06-16T04:46:29+5:30
मेहकर : वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या कोराडी योजना, आनिकट योजना व फिल्टर प्लांटवरील विद्युत ...
मेहकर : वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या कोराडी योजना, आनिकट योजना व फिल्टर प्लांटवरील विद्युत पुरवठा सतत बंद पडत असल्याने शहरातील नागरिकांना तेराव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे़ संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांनी तत्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करावे अन्यथा वीज वितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा नगरपरिषदेचे नियोजन सभापती तौफिक कुरेशी, नगरसेवक मनोज जाधव यांनी दिला आहे़
मेहकर शहर व परिसराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ शहरात ग्रामीण भागातील नागरिक ही मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित होत असल्याने शहरातील पायाभूत सुविधांवर ही मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे़ मेहकर शहराला कोराडी प्रकल्प तथा आणि अनिकटवरुन पाणीपुरवठा करण्यात येतो़ कोराडी प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा असताना वीज वितरणाच्या गलथान कारभारामुळे गेल्या काही दिवसांपासून कोराडी योजना,आनिकट योजना व फ़िल्टर प्लांटवरील विद्युत पुरवठा वेळोवेळी खंडित होत असल्याने शहरात नागरिकांना तेराव्या दिवशी पाणीपुरवठा करावा लागत आहे़ त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गैरसोय होताना दिसत आहे़ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी संबंधित विभागाला पत्र दिल्यानंतर ही अद्यापपर्यंत दखल घेतली गेली नाही़ वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीरतेने लक्ष घालून विद्युत पुरवठा सुरळीत करावे अन्यथा वीज वितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा नगरपालिकेचे सभापती तौफिक कुरैशी, नगरसेवक मनोज जाधव यांनी दिला आहे़