मालेगावातील ३५ कोटीची पाणी पुरवठा योजना थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 05:50 PM2019-03-01T17:50:45+5:302019-03-01T17:51:08+5:30

मालेगाव (वाशिम): शहराची वाढलेल्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाºया पाणीटंचाईवर कायम मात करण्यासाठी प्रस्तावित केलेली ३५ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना थंड बस्त्यात पडली आहे.

water supply scheme in Malegaon pending | मालेगावातील ३५ कोटीची पाणी पुरवठा योजना थंडबस्त्यात

मालेगावातील ३५ कोटीची पाणी पुरवठा योजना थंडबस्त्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
मालेगाव (वाशिम): शहराची वाढलेल्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाºया पाणीटंचाईवर कायम मात करण्यासाठी प्रस्तावित केलेली ३५ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना थंड बस्त्यात पडली आहे. शहराला अद्यापही एकाच जलकूंभातून पाणी पुरवठा होत असून, तालुक्यातील धरणांनी तळही गाठला आहे. त्यामुळे यंदाही शहरवासियांवर तीव्र पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची भिती आहे. 
मालेगाव ग्रामपंचायतचे नगर पंचायतमध्ये रुपांतर होऊन तीन वर्षांंचा कालावधी उलटला आहे, तर शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मूलभूत सुविधांत मात्र फारशी सुधारणा येथे झालेली नाही. त्यात शहरातील पाणी पुरवठा, ही अत्यंत ज्वलंत अशी समस्या आहे. दरवर्षी मालेगाव शहरात पाणीटंचाई जाणवते. शहराला गेल्या २५ वर्षांपासून पाणी पुरवठा करण्यासाठी एकच जलकूं भ असून, या जलकूंभातून एकाच वेळी संपूर्ण शहरवासियांना पुरेसा पाणी पुरवठा होणे शक्य नाही. त्यातच शहराला पाणी पुरवठा करणाºया प्रकल्पांची पातळीही उन्हाळ्यापूर्वीच तळ गाठण्यास सुरुवात करते. त्यामुळे उन्हाळाभर नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गतवर्षी अपुºया पावसामुळे नागरिकांना अतिशय भीषण पाणीटंचाईचे चटके सोसावे लागले होते. त्यावेळी चाकातीर्थ प्रकल्पावरून कुरळा प्रकल्पापर्यंत पाणी आणून, नागरिकांची तहान भागविण्यासाठी तात्पुरती योजना सुरू करण्यात आली. ती योजनाही फारसी उपयुक्त ठरली नाही. प्रत्यक्षात मालेगाव शहराची पाणीटंचाई कायम मिटविण्यासाठी प्रशासनाने ३५ कोटींची योजना प्रस्तावित केली आहे. तथापि, या योजनेचे कोणतेही काम अद्याप सुरू झाले नाही. आता यंदाही तालुक्यातील प्रकल्पांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. त्यात विहिरी आणि कूपनलिकाही कोरड्या पडत आहेत. त्यामुळे नागरिकांवर पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची भिती आहे. त्यामुळे नगर पंचायत प्रशासनाने वेळीच उपाय योजना करणेही आवश्यक आहे; परंतु अद्यापही यावर कोणताच ठराव, निर्णय झालेला नाही. 

  मालेगाव शहरात यंदा पाणीटंचाई भासणार नाही. यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. तात्पुरती पाणी पुरवठा योजना सुरू करून शहरात पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यात येईल, तसेच ३५ कोटीच्या कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजनेसाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. 
-रेखा अरूण बळी
नगराध्यक्ष, मालेगाव

Web Title: water supply scheme in Malegaon pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.