पाणीपुरवठा योजनांचे पुनर्निरीक्षण

By admin | Published: August 11, 2015 11:51 PM2015-08-11T23:51:51+5:302015-08-11T23:51:51+5:30

दरडोई पाणीपुरवठा वाढणार; जनुना व सुटाळा खुर्द या गावांचा समावेश.

Water Supply Schemes Revised | पाणीपुरवठा योजनांचे पुनर्निरीक्षण

पाणीपुरवठा योजनांचे पुनर्निरीक्षण

Next

खामगाव: शहरालगत असलेल्या जनुना व सुटाळा या गावातील नागरिकांना नवीन निकषानुसार पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजनांची चाचपणी प्रशासकीय स्तरावरून केली जात आहे. यासाठी बुलडाणा जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून या योजनांच्या पुनर्निरीक्षणासाठी पालिका प्रशासनाकडे विचारणा केली जात आहे. या योजनांचे पुनर्निरिक्षण झाल्यास उपरोक्त दोन्ही गावातील नागरिकांना प्रत्येकी ७0 लिटर पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे संकेत आहेत. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातंर्गत शहरालगतच्या ग्रामपंचायती, वाड्या, वस्त्यांमध्ये दरडोई दरदिवशी अधिकतम ७0 लिटर पर्यतच्या सुधारित/ नवीन पाणी पुरवठा योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने १४ सप्टेंबर २0१४ रोजी मान्यता दिली आहे. त्यानुसार शहरालगतच्या ग्रामपंचायत, वाडी, वस्तीमध्ये दरडोई दरदिवशी अधिकतम ७0 लिटर क्षमतेपर्यंतच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजना घेण्यासाठी उपाययोजना केल्या जात असून खामगाव शहरालगतच्या सुटाळा आणि जनुना या दोन्ही ग्रामपंचायतीचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे उपरोक्त दोन्ही गावांमधील पाणीपुरवठा योजनांच्या निश्‍चितीकरणासोबतच त्यांचा प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अंमलबजावणी केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर जनुना आणि सुटाळा येथील पाणीपुरवठा योजनांचे पुनर्निरिक्षणकरून प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या कामास गती दिल्या जात आहे. या पाणीपुरवठा योजनांना मान्यता मिळाल्यास या गावातील नागरिकांना ग्रामीण भागासाठी दरडोई दरदिवशी किमान ४0 लिटर क्षमतेऐवजी ७0 लिटर पाण्याचा पुरवठा होईल. यामुळे नागरिकांना आवश्यतेप्रमाणे पाणी मिळणार असून पाणीटंचाई दूर होणार आहे.

Web Title: Water Supply Schemes Revised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.