सिंदखेड राजात दोन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 10:53 AM2021-05-24T10:53:20+5:302021-05-24T10:53:44+5:30

Sindkhed Raja news : दोन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, १६ गावांतील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

Water supply by tanker to two villages in Sindkhed Raja | सिंदखेड राजात दोन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

सिंदखेड राजात दोन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  सिंदखेडराजा : तालुक्यातील अनेक गावांतील पाणीटंचाई विचारात घेता पंचायत समितीस्तरावरून टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्यात येत आहे. दरम्यान, वर्तमान स्थितीत दोन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, १६ गावांतील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
टंचाई निवारणासाठी सध्या पंचायत समितीस्तरावरून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. यामध्ये विहिरींचे अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा, तात्पुरत्या स्वरूपातील नळयोजना, नळयोजना दुरुस्ती असे उपाय करण्यात येत आहेत. तालुक्यातील अनेक गावांत मेअखेरपर्यंत व त्यापुढे साठा होण्याइतपत पाऊस पडेपर्यंत पाणीटंचाईची तीव्रता जाणवण्याची शक्यता आहे. यासाठी तालुक्यातील २८ गावांत विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. त्यापैकी १६ गावांत विहिरींचे अधिग्रहण झाले असून, १२ ठिकाणी अधिग्रहणाची कार्यवाही सुरू आहे. दुसरीकडे सावरगाव माळ व दरेगाव या दोन गावात सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 
विहीर अधिग्रहण होत असलेल्या गावांमध्ये भंडारी, बाळसमुद्र, सायाळ, शेलू, बुट्टा, माळ सावरगाव दोन, नाईकनगर, वसंतनगर, दत्तपूर, पि. सोनारा, राजेगाव, धांदरवडी दोन, शेंदुर्जन ४, बारलींगा, जागदरी, शिंदी, तांदुळवाडी, गोरेगाव, डावरगाव, वडळी, सोनोशी, खामगाव, कंडारी या  गावांचा समावेश आहे. 

Web Title: Water supply by tanker to two villages in Sindkhed Raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.