चार गावांसाठी पाण्याचे टँकर मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:32 AM2021-03-24T04:32:33+5:302021-03-24T04:32:33+5:30
चिंचखेडनाथ येथील लोकसंख्या ८६८ असून इसालवाडी येथील ६९२ आहे. टँकरद्वारे दररोज २४ हजार ९९० लीटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार ...
चिंचखेडनाथ येथील लोकसंख्या ८६८ असून इसालवाडी येथील ६९२ आहे. टँकरद्वारे दररोज २४ हजार ९९० लीटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी, मलकापूर यांनी कळविले आहे. चिखली तालुक्यातील तांबुळवाडी येथील लोकसंख्या ३५०० असून सैलानी नगर येथील २०० आहे. टँकरद्वारे दररोज ७५ हजार ७००लिटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी, बुलडाणा यांनी कळविले आहे.