पाईपलाईन फुटल्याने पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:31 AM2021-01-21T04:31:30+5:302021-01-21T04:31:30+5:30
बुलडाणा : येळगाव धरणातून बुलडाणा शहराला पाणीपुरवठा केल्या जातो. या पाईपलाईनला माळविहीर परिसरातील काही शेतकऱ्यांनी फोडले आहे. त्यामुळे माळविहीर ...
बुलडाणा : येळगाव धरणातून बुलडाणा शहराला पाणीपुरवठा केल्या जातो. या पाईपलाईनला माळविहीर परिसरातील काही शेतकऱ्यांनी फोडले आहे. त्यामुळे माळविहीर परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.
वन्यप्राण्यांकडून हरभरा पिकाची नासधूस
मोताळा : तालुक्यातील मूर्ती येथे दीड एकर शेतातील हरभऱ्याची वन्यप्राण्यांनी नासधूस केली आहे. त्यामुळे विनोद सावकारे या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वनविभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
आग्यामोहोळाच्या माशा चावल्याने युवक जखमी
बुलडाणा : आग्यामोहोळाच्या माशा चावल्यामुळे एक २५ वर्षीय युवक जखमी झाला. भादोला येथील संजय कोळपते हा युवक शेतात रखवालीसाठी गेला असता. त्याला आग्यामोहोळाच्या माशा चावल्या. युवकास अकोला येथे हलविण्यात आले आहे.
गरीब विद्यार्थ्यांना दिली पुस्तके
मोताळा : तालुक्यातील शेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते सीताराम चिम गुरुजी यांनी परिसरातील ५१ विद्यार्थ्यांना महापुरुषांची पुस्तके भेट दिली. वर्षभरात ५००१ पुस्तके भेट देण्याचा संकल्प चिम गुरुजींचा आहे.
---