येळगाव धरणाचे जलपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:41 IST2021-09-09T04:41:30+5:302021-09-09T04:41:30+5:30
बुलडाणा तालुक्यात ६ व ७ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहिले. यामुळे येळगाव धरणात पाणीसाठा येत ...

येळगाव धरणाचे जलपूजन
बुलडाणा तालुक्यात ६ व ७ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहिले. यामुळे येळगाव धरणात पाणीसाठा येत गेला. ८ सप्टेंबर रोजी येळगाव धरण हे ९५ टक्के भरले. त्याचे जलपूजन बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष पूजाताई संजय गायकवाड, विद्यमान नगरध्यक्षपती मो. सज्जाद, मृत्युंजय संजय गायकवाड, तहसीलदार रूपेश खंडारे, शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, आरोग्य सभापती आशिष जाधव, बाळासाहेब धूड, उपनगराध्यक्ष विजय जायभाऐ, माजी शहर प्रमुख मुन्ना बेंडवाल, शिवसेना गटनेते, उमेश कापूरे, नगरसेवक दीपक सोनुने, मीनाताई रमेश गायकवाड, पुष्पाताई धूड, माजी नगरसेवक गोविंदा खुमकर, नगरसेवक मोहन पऱ्हाड, भाजपा नगरसेवक उदय देशपांडे, वैभव इंगळे, नईम कुरेशी, जीवन उबरहंडे, दीपक तुपकर, अनिल जगताप, ज्ञानेश्वर खांडवे, सचिन कोठाळे, सर्व न.पा. अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.