कलिंगडाला लाॅकडाऊनमुळे भाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:32 AM2021-03-06T04:32:50+5:302021-03-06T04:32:50+5:30

साखरखेर्डा : काेराेनाचा वाढता प्रभाव आणि वेळोवेळी जाहीर होणारी संचारबंदी यामुळे कलिंगड या फळाला बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने ...

Watermelon has no price due to lockdown | कलिंगडाला लाॅकडाऊनमुळे भाव नाही

कलिंगडाला लाॅकडाऊनमुळे भाव नाही

googlenewsNext

साखरखेर्डा : काेराेनाचा वाढता प्रभाव आणि वेळोवेळी जाहीर होणारी संचारबंदी यामुळे कलिंगड या फळाला बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना स्वतःच विक्री करावी लागत आहे. मागणी नसल्याने कलिंगडाचे भाव काेसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

साखरखेर्डा येथील आठवडी बाजार हा दर शुक्रवारी भरतो. कोरोना संसर्गजन्य आजारामुळे मागील दोन आठवड्यांत बाजार बंदीमुळे शुकशुकाट पसरला होता. शुक्रवारी शासनाच्या कोणत्याही सूचना न मिळाल्याने काही किरकोळ व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटून भाजी बाजार थाटला होता. दर आठवड्याला भरणारा बाजार भरल्यानंतर कोरोनाच्या फैलावाच्या भीतीने ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. शिंदी येथील एका बागायतदाराने एका ट्रॅक्टरमध्ये कलिंगड (टरबूज) आणले होते. परंतु बाजार सुरू की बंद या घालमेलीत त्यांचे कलिंगड कोणीही खरेदी केले नाही. २० ते २५ क्विंटल कलिंगड रस्त्यावर फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्या बागायतदार शेतकऱ्याने हताश न होता, फळांची वजनावर किंमत ठरवून गावात चौकाचौकांत उभे राहून कलिंगडाची विक्री केली. घरपोच कलिंगड मिळत असल्याने ग्राहकांनी त्या शेतकऱ्याचे कलिंगड १० रुपये प्रति किलो दराने खरेदी करून सहकार्य केले.

कलिंगड, खरबूजची माेठ्या प्रमाणात लागवड

साखरखेर्डा भागात शिंदी, तांदूळवाडी, दरेगाव, शेंदुर्जन पिंपळगाव सोनारा या गावांतील असंख्य शेतकऱ्यांनी पपई, कलिंगड, खरबूज या फळांची लागवड केली आहे. सध्या फळे विक्रीसाठी तयार असल्याने शेतकरी विविध बाजारांत नेत आहेत. मात्र, आठवडी बाजारात ग्राहक नसल्याने शेतकऱ्यांना बेभाव विकावे लागत आहेत.

चिखली, मेहकर या बाजारपेठा जवळच्या असल्याने मोठ्या प्रमाणात फळे विक्रीसाठी नेण्यात येतात. परंतु लाॅकडाऊनमुळे फळांना खरेदीदार मिळत नसल्याने ग्रामीण भागात जाऊन फळांची विक्री करावी लागत आहे.

- अनंता शेळके

बागायतदार, तांदूळवाडी

Web Title: Watermelon has no price due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.