पीक नष्ट होण्याच्या मार्गावर
By admin | Published: September 13, 2014 12:08 AM2014-09-13T00:08:43+5:302014-09-13T00:08:43+5:30
सावत्रा परिसरात सोयाबीन पाठोपाठ मुगावरही करपा.
सावत्रा : परिसरात सोयाबीन पीकावर करपा आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. परंतु सततचा पाऊस आणि खराब वातावरणामुळे आता मूग पीक शेवटच्या टप्प्यात असतांना परिसरातील पिकावर करपा येत आहे. १ हजार २00 शेतकर्यांनी निव्वळ मूग व काहींनी कपाशी अंतर पीक म्हणून मूग पेरा केला. मात्र या पिकांवर करपा येत असल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मृग नक्षत्रातच पावसाने हुलकावणी दिल्यामुळे तब्बल ४५ दिवस खरीप पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यानंतर थोड्या बहुत प्रमाणावर झालेल्या पावसावर परिसरातील शेतकर्यांनी सोयाबीनसह मूग, का पूस व उडीद आदी पीक पेरा केला. मात्र आता या खरीप पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. परिसरातील जवळपास १ हजार २00 शेतकर्यांनी निव्वळ मूग व काहींनी कपाशी अंतर पीक म्हणून मूग पेरा केला. मेहकर कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने सावत्रा येथील ३0 हेक्टरवर मूगाचा प्लॉटींग प्रयोग केलेला आहे. त्यावरुन एक गुंठय़ात होणार्या उत्पन्नावरुन तालुक्याचे सरासरी उत्पन्न काढले जाते. परिसरातील मूग पीक हे शेवटच्या टप्प्यात आहे. परंतु मूग पीक करपून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मूग पीकाचा उत्पन्नाचा अंदाज चुकणार आहे. जवळपास सर्वच कास्तकारांनी मूग पिकाचा विमा काढलेला आहे, मात्र पाऊस आणि खराब वातावरणामुळे पिक खराब होण्याच्या मार्गावर आहे. मूग पिकाचा सर्वे करुन मदत देण्याची मागणी शेतकर्यांमधून होत आहे.