नगराध्यक्ष आणि नगरसेवकामध्ये हमरी-तुमरी !

By admin | Published: August 26, 2015 11:52 PM2015-08-26T23:52:48+5:302015-08-26T23:52:48+5:30

खामगाव पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद शिगेला.

We are your municipal councilors and corporators. | नगराध्यक्ष आणि नगरसेवकामध्ये हमरी-तुमरी !

नगराध्यक्ष आणि नगरसेवकामध्ये हमरी-तुमरी !

Next

खामगाव : शहर विकास आघाडीचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यात बुधवारी दुपारी १२.३0 वाजता पालिका सभागृहात हमरीतुमरी झाली. या प्रकरणी नगरसेवक वर्मा आणि नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा यांनी परस्पर विरोधी तक्रार शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. दरम्यान, वर्मा यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी नगराध्यक्ष तथा माजी आमदार सानंदा यांच्यासह इतर ८-१0 जणांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा आणि मुख्याधिकारी डी.ई.नामवाड यांच्यासह सत्ताधारी नगरसेवक आणि काँग्रेसच्या काही पदाधिकार्‍यांसह बुधवारी दुपारी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा यांच्या दालनात बसले होते. त्यावेळी शहर विकास आघाडीचे नगरसेवक संदीप वर्मा, माजी नगराध्यक्ष गणेश माने, अरूण आकोटकर, विजय उगले, आनंद शहाणे हे शहरातील विविध समस्यांचे निवेदन देण्यासाठी नगराध्यक्षांच्या दालनात गेले. त्यावेळी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देवून नगरसेवक समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चा करत असताना नगराध्यक्ष अशोक सानंदा व दिलीपकुमार सानंदा यांनी हस्तक्षेप करीत ह्यआम्ही ठेकेदारांशी बोलून बघून घेवू, तुम्ही येथून निघून जाह्ण असे म्हणत वाद घातला व नगरसेवकांना शिवीगाळ करून धमकी दिली. यावेळी सानंदा यांच्यासोबत इतर दहा जण उपस्थित होते. या आशयाच्या नगरसेवक संदीप वर्मा यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी नगराध्यक्ष अशोक सानंदा, दिलीपकुमार सानंदा व इतर १0 जणांविरुध्द कलम ५0४, ५0६ भादंविनुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. तर नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा यांनीही सायंकाळी शहर पोलिस स्टेशनमध्ये वर्मा यांनी खोटी तक्रार दाखल केली असून नगराध्यक्षांच्या परवानगी शिवाय त्यांनी दालनात येत, गोंधळ घातल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवर पोलिसांकडून कारवाई सुरु होती.

Web Title: We are your municipal councilors and corporators.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.