दिवाळीच्या दिवशी चटणी भाकर खाणार, शिंदे गटातील आमदाराने सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 04:42 PM2022-10-23T16:42:27+5:302022-10-23T16:43:41+5:30

बळीराजावर ओढावलेल्या संकटामुळे शेतकऱ्याची दिवाळी यंदा अंधारात साजरी होत आहे. शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव असल्याने शेतकऱ्यांना आधार देत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.

We will eat chutney bread on Diwali for farmer, says MLA Sanjay gaikwad of Shinde group in buldhana | दिवाळीच्या दिवशी चटणी भाकर खाणार, शिंदे गटातील आमदाराने सांगितलं राज'कारण'

दिवाळीच्या दिवशी चटणी भाकर खाणार, शिंदे गटातील आमदाराने सांगितलं राज'कारण'

googlenewsNext

बुलढाणा - राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यावर मोठं संकट ओढावलं असून माजी मुख्यमंत्री आणि शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच औरंगाबादमध्ये जाऊन पाहणी दौरा केला. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. तत्पूर्वी, शिंदे गटाच्या आमदाराने शेतकऱ्यांच्या या दु:खात सहभागी होण्यासाठी आपणही दिवाळी न साजरी करता उद्या म्हणजे पहिल्या अंघोळीच्यादिवशी चटणी-भाकर खाऊन दिवाळी साजरी करणार असल्याची घोषणा केली. त्यासाठी, जिल्हाधकारी कार्यालयासमोर ही कृती करुन एक संदेश देणार असल्याचंही ते म्हणाले. 

बळीराजावर ओढावलेल्या संकटामुळे शेतकऱ्याची दिवाळी यंदा अंधारात साजरी होत आहे. शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव असल्याने शेतकऱ्यांना आधार देत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. त्यामुळे आपणही यंदाची दिवाळी साजरी करणार नाही. अशी भूमिका आमदार संजय गायकवाड यांनी घेतली आहे. तसेच, मी कुठलाही निषेध नोंदवणार नाही, कुठलाही घोषणाबाजी करणार नाही. त्यामुळे हे सरकारविरोधात आंदोलन नाही. केवळ, समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचंही गायकवाड यांनी म्हटलं आहे. या भूमिकेमागे कुठलंही राजकारण नसल्याचंही ते म्हणाले.  

परतीच्या पावसाने जिल्हाभरात शेतकऱ्यांसमोर डोंगराचा संकट उभा केला आहे हातात तोंडाशी आलेला घास हरवल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. सगळ्यांची दिवाळी उत्साहाने साजरी होत असताना शेतकऱ्यांची दिवाळी मात्र संकटाने साजरी होत आहे. मागील दोन वर्षात कोरोना संक्रमणामुळे दिवाळीवर संकट होते.यंदा वातावरण निवळल्याने दिवाळी उत्साहात साजरी होईल असे वाटत होते. मात्र, परतीच्या पावसाने हे स्वप्न देखील धुळीस मिळाले .सातत्याने तिसऱ्या वर्षी शेतकऱ्याची दिवाळी साजरी होत नसल्याने शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव ठेवून या पोशिंदाच्या पाठीमागे आपण आहोत ही भूमिका घेत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी घेतली. तसेच, दीपावलीच्या दिवशी आपण कोणत्याही प्रकारचा दिवा लावणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले. 
 

Web Title: We will eat chutney bread on Diwali for farmer, says MLA Sanjay gaikwad of Shinde group in buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.