डबल मास्क घाला, काेराेना टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:56 AM2021-05-05T04:56:42+5:302021-05-05T04:56:42+5:30

बुलडाणा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर अजूनही थांबला नाही. जिल्ह्यात रोज दोनशेपेक्षा जास्तच रुग्ण वाढत असून, नागरिकांनी मास्क वापरल्यासच ...

Wear a double mask, avoid carotenoids | डबल मास्क घाला, काेराेना टाळा

डबल मास्क घाला, काेराेना टाळा

Next

बुलडाणा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर अजूनही थांबला नाही. जिल्ह्यात रोज दोनशेपेक्षा जास्तच रुग्ण वाढत असून, नागरिकांनी मास्क वापरल्यासच त्याला आळा बसणार आहे. त्यातच डबल मास्क घाला अन्‌ कोरोना टाळा, असा नवा ट्रेंड दिसत असून, अनेक जण दुहेरी मास्क वापरत आहेत. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते एक मास्कही व्यवस्थित वापरला, तर कोरोनापासून बचाव शक्‍य आहे. मास्क वापरण्यासाठी अनेकांना अजूनही अवघड वाटते. अनेक जण मास्क योग्य पद्धतीने वापरत नाहीत. डॉक्टरांच्या मते चुकीच्या पद्धतीने मास्क वापरणे म्हणजे तो न वापरल्यासारखाच आहे. मास्क वापरताना तो एम-९५ अथवा सर्जिकल मास्क असल्यास पूर्ण सुरक्षा होऊ शकते. फॅन्सी, ब्रँडेड, डिझायनर मास्कमुळे पूर्ण सुरक्षेची हमी देता येणे अवघड आहे. रुमाल अथवा कापडी रुमाल वापरणेही तसेच धोक्याचे ठरू शकते. गर्दीच्या ठिकाणी जाणारे अथवा सार्वजनिक ठिकाणी कायम वावरणाऱ्यांनी मास्कच्या बाबतीत जागरूक असणे आवश्‍यक आहे. नाक व तोंड योग्य पद्धतीने झाकले गेले, तरच मास्क लावण्याचा उपयोग आहे, शिवाय वारंवार मास्कला हातही लावता कामा नये. कुठेही हात लावल्याने त्याद्वारे संसर्गाची असणारी भीती सॅनिटायझरने कमी हाेते. मात्र, सॅनिटायझरचा विसर पडल्यास मास्कला कुठेही हात लावल्यास काेराेना संसर्ग हाेण्याची भीती असते.

कोरोना संसर्ग राेखण्यासाठी मास्क हाच पर्याय

नाक व तोंडावाटेच कोरोनाचा विषाणू शरीरात प्रवेश करण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे मास्कचा वापर केल्यास संसर्गापासून दूर राहता येणे शक्‍य आहे. त्यासाठी मास्क सर्जिकल अथवा एन-९५ असल्यास अधिक चांगले. कोरोनाच नव्हे, तर दमा, ॲलर्जी यापासूनही बचाव होतो, हवेतून पसरणारा संसर्ग टाळता येतो, टीबीसारखे रुग्ण मास्कच्या नियमित वापरामुळे कमी झाले आहेत.

मास्क कसा वापरावा?

मास्क नाक व तोंड झाकण्यासह सगळीकडून तोंडावर फिट असेल, याची काळजी घेणे आवश्यक आहे. नाक व तोंडात इतर भागांतून हवा जाता कामा नये. मास्क सिंगल असो वा इबल हे पथ्य न पाळल्यास काहीच उपयोगी नाही. मास्कची जी बाजू बाहेरून आहे, तीच कायम बाहेरून असावी. त्यात बदल झाला, तर संसर्गाचा घोका आहे. मास्कच्या वरच्या भागास हात लावू नये. सहसा वैद्यकीय वापरासाठीचे मास्कच वापरावे.

हे करावे

मास्क वापरताना ताे नाक व ताेंड पूर्णपणे झाकेल अशा पद्धतीने लावावा. नाकारवरील पट्टी दाबून द्यावी व इतर भागातून हवा जाता कामा नये. जी बाजू बाहेरून आहे, ती कायम तशीच राहावी, सिंगल सर्जिकल मास्कही योग्य पद्धतीने वापरणे गरजेचे, गर्दीच्या ठिकाणी जायचे असल्यास डबल मास्क वरीलप्रमाणे वापरल्यास संसर्गाचा धोका टळतो.

मास्क लावल्यानंतर त्याच्या वरच्या भागाला कधीही हात. लावू नये, तो वारंवार काढू नये, मास्क काढताना मागच्या बाजूने पट्ट्यांना बोटांनी पकडून काढावा, घरात अथवा सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर टाकू नये. कागद अथवा प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून कचराकुंडीत टाकावा. धुवायचा असेल, तर थेट सोडा व डेटॉलच्या पाण्यात टाकावा.

Web Title: Wear a double mask, avoid carotenoids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.