अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात वेबिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:35 AM2021-04-27T04:35:32+5:302021-04-27T04:35:32+5:30

यामध्ये अक्षय रूद्राक्ष सी.सी.सी. इन्फार्मेशन सर्विसेस, लॉस एंजेल्समधील वरिष्ठ व्यवस्थापक यांनी संबंधीत विषयाबाबत तपशीलवार वर्णन करून यातील आव्हाने, या ...

Webinar at Anuradha Engineering College | अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात वेबिनार

अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात वेबिनार

Next

यामध्ये अक्षय रूद्राक्ष सी.सी.सी. इन्फार्मेशन सर्विसेस, लॉस एंजेल्समधील वरिष्ठ व्यवस्थापक यांनी संबंधीत विषयाबाबत तपशीलवार वर्णन करून यातील आव्हाने, या विषयावर संवाद साधला. क्रॉस-प्लॅटफॉर्मसाठी संभाव्य तंत्रज्ञान, वेब अ‍ॅप्स आणि नेटिव्ह अ‍ॅप्स, फ्लटर पॅकेजेस, ओपन-सोर्स प्लगइन्स, गुगल फ्लटरसाठी सध्याची बाजारपेठ, भविष्यवाणी आणि आयटी उद्योगात चांगली नोकरी मिळण्यासाठी अधिक व्यावहारिक कौशल्य, संप्रेषण कौशल्य, ईमेल लेखन आणि व्यक्तिमत्त्व विकास आत्मसात करण्यास प्रोत्साहित केले. या वेबिनारसाठी १०० विद्यार्थी ऑनलाइन जोडलेले होते. माहिती-तंत्रज्ञान, संगणक विज्ञान व अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकीचे २०० हून अधिक विद्यार्थी यूट्यूब थेट प्रक्षेपणाद्वारे सहभागी झाले होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.ए.एन.नन्हई यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.एन.एन.कुंभार तर आभार विभागप्रमुख डॉ.ए.एस.कापसे यांनी मानले. प्रा.पी.एस.इंगळे, गजानन लागे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Webinar at Anuradha Engineering College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.