फार्मा उद्योग व नवीन दृष्टिकोन विषयावर वेबिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:35 AM2021-02-24T04:35:50+5:302021-02-24T04:35:50+5:30
चिखली : स्थानिक अनुराधा गृप आॅफ फार्मसी इन्स्टिट्यूटच्यावतीने 'फार्मा उद्योग नवीन दृष्टिकोन' या विषयावर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा रेडडीज ...
चिखली : स्थानिक अनुराधा गृप आॅफ फार्मसी इन्स्टिट्यूटच्यावतीने 'फार्मा उद्योग नवीन दृष्टिकोन' या विषयावर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा रेडडीज लॅब हैद्राबादचे असोसिएट डायरेक्टर हिमांशु जोशी यांचा वेबिनार संपन्न झाला. यामध्ये ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
संस्थेचे सचिव तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली २० फेब्रुवारी आॅनलाईन पध्दतीने आयोजित या वेबिनारमध्ये मार्गदर्शन करताना बोंद्रे यांनी महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट या विभागामार्फत कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्याच्या उद्ेशाने महाविद्यालयाने माजी विद्यार्थी,विविध कंपन्याच्या उच्चपदस्थ कार्यरत असलेल्या कंपन्याशी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी आयोजित या वेबिनारचे कौतुक केले. दरम्यान फार्मसी उद्योगातील रोजगाराच्या संधी याविषयावर हिमांशु जोशी यांनी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.के.आर. ़बियाणी यांनी नवीन विद्यार्थ्यांना फार्मसी उद्योगाची माहिती व संधी उपलब्ध व्हावी या हेतूने या वेबिनारचे आयोजन केले असल्याचे स्पष्ट केले. संचलन व आभार प्रा.यु.एम.जोशी यांनी मानले.