मराठा समाजाचा विवाह सोहळा
By Admin | Published: March 18, 2015 01:45 AM2015-03-18T01:45:37+5:302015-03-18T01:45:37+5:30
गुढीपाडव्याच्या दिवशी आयोजन; नऊ जोडपी होणार विवाहबद्ध.
खामगाव (जि. बुलडाणा) : अखिल भारतीय मराठा महासंघ व मराठा समाज सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर २१ मार्च रोजी मराठा समाज सामूहिक सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात ९ जोडपी विवाहबद्ध होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक गणेश माने मंगळवारी यांनी दिली. वेळ, पैसा, परिश्रम याची बचत व्हावी समाजात एकतेची भावना निर्माण व्हावी, समाजाची प्रगती व्हावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून अखिल भारतीय मराठा महासंघ व मराठा समाज सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. या सोहळ्यात मागील वर्षी १९ जोडपी विवाहबद्ध झाली होती. तर यावर्षी ९ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. हा विवाह सोहळा जे.व्ही. मेहता नवयुग विद्यालयाच्या प्रांगणावर सकाळी ११ वा. संपन्न होणार आहे. प्रितीभोज दुपारी १२ ते ५ या दरम्यान होईल. यावेळी अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.