भगवान बाहुबलींच्या ३१ फुटी मूर्ती पाषाणाचे खामगावात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 06:28 PM2021-01-11T18:28:54+5:302021-01-11T18:29:06+5:30
Lord Bahubali हिंगोली जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे भगवान बाहुबलीच्या ३१ फूटी मूर्ती स्थापित करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: हिंगोली जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे भगवान बाहुबलीच्या ३१ फूटी मूर्ती स्थापित करण्यात येणार आहे. राजस्थानमधील बिछोलीया येथून ग्रॅनाईटचा पाषाण घेऊन १ जानेवारी रोजी हा ट्रक रवाना झाला. सोमवारी खामगावातून मार्गस्थ होत असताना या पाषाणाचे जैन समाज बांधवांनी भव्य स्वागत केले.
प. पू. गणाचार्यश्री विराग सागरजी महामुनिराज यांच्या तसेच प.पू वात्सल्यमुर्ती श्रमण मुनीश्री विशेष सागरजी गुरूदेव यांच्या विशेष प्रेरणा आणि आशिर्वादाने पुसेगॉव जि.हिंगोली येथे पहिल्यादांच भगवान महाविरांच्या ३१ फुटी मूर्ती स्थापित करण्यात येणार आहे. प.पू.श्रमणमुनि गुरूदेवश्री विशेषसागरजी महाराज की विशेष पुढाकारातून प.पू.वात्सल्य दिवाकर, निमित्तज्ञानी आचार्यश्री विमलसागरजी महाराज यांच्या पुण्यतिथी पर्वावार खान्देशच्या पावन भूमीवर सुरूवातीला यामूर्तीसाठी नेण्यात येणाºया पाषाणाचे स्वागत झाले. त्यानंतर मुक्ताईनगर, मलकापूर खामगाव येथे बाहुबलींच्या मूर्तीसाठी नेण्यात येणाºया पाषाणाचे स्वागत झाले. धर्म नगरी सावदा जैन समाजाच्यावतीने अध्यक्ष नरेन्द्र जैन, सचिव रविंद्र जैन, डॉ.दिपक जैन, विमलेश जैन, संजय जैन, काशिनाथ जैन, शुभम जैन, दर्शन जैन, पारस जैन आणि सौ.छाया जैन, रावेर येथे जैन समाजाचे अध्यक्ष उज्वल डेरेकर, सुनीता डेरेकर, चंद्रकांत डेरेकर, ओजस डेरेकर, फैजपूर जैन समाजावतीने अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष सुनील जैन, योगेश जैन आणि मुक्ताईनगर जैन समाजाचे अध्यक्ष विपुल जैन और सुभाष पांडव सहपरिवार स्वागत केले. खामगाव येथेही या मूर्तीचे स्वागत झाले. नांदुरा, खामगाव, मोताळा, सिंदखेड येथील जैन समाज बांधवांनी मूर्तीचे स्वागत केले. त्यानंतर भगवान बाहुबलींच्या मूर्तीचा पाषाण हिगोंलीच्या दिशेने मार्गस्थ झाला.