मलकापूर-शेगाव पायदळ दिंडीचे स्वागत

By admin | Published: July 11, 2014 11:56 PM2014-07-11T23:56:24+5:302014-07-12T00:14:53+5:30

मलकापूर येथून शेगावकडे जाणार्‍या पायदळ दिंडीचे खामगाव शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

Welcome to Malkapur-Shegaon Infantry | मलकापूर-शेगाव पायदळ दिंडीचे स्वागत

मलकापूर-शेगाव पायदळ दिंडीचे स्वागत

Next

खामगाव : आषाढी एकादशीनंतर गुरुपौर्णिमेला संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची शेगावी गर्दी जमत असून, आज शुक्रवारी मलकापूर येथून शेगावकडे जाणार्‍या पायदळ दिंडीचे खामगाव शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
आषाढी एकादशीनंतर गुरुपौर्णिमेला संतनगरीत गजानन महाराजांच्या दर्शनाकरिता विविध ठिकाणाहून वारकरी पायदळ दिंडी करतात. मलकापूर ये थील संत गजानन महाराज मंडळाच्यावतीने सुमारे पाच हजार भक्तांची दिंडी शेगावला आज रवाना झाली. या दिंडीचे शहरात ठिकठिकाणी सामाजिक संघटनाच्यावतीने स्वागत करण्यात आले. या पालखीमध्ये श्री गजानन महाराजांचा रजत मुखवट्याची भाविकांनी पूजा केली. या दिंडींचे वैशिष्ट्य म्हणजे दिंडीतील वारकरी यांचे एक टोक जलंब नाक्याजवळ, तर दुसरे टोक बसस्थानकाजवळ असल्याने सुमारे पाच हजार महिला, पुरुषांचा यामध्ये समावेश होता. गजाननाचा नामघोषात ही दिंडी शेगावकडे रवाना झाली.

Web Title: Welcome to Malkapur-Shegaon Infantry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.