मेहेकर येथे सामुदायिक तबला वादनाने नववर्षाचे स्वागत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:15 AM2018-01-02T00:15:23+5:302018-01-02T00:40:26+5:30
मेहकर : स्थानिक चनखोरे कॉलनीत नवीन वर्षाचे स्वागत सामुदायिक तबला वाजवून संगीतमय पद्धतीने करण्यात आले. या आगळ्या वेगळ्या नववर्षाच्या स्वागताला परिसरातील विद्यार्थी व तबला वादकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क

मेहकर शहरातील चनखोरे कॉलनीत तबलासाधकांनी ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ ते १२ दरम्यान एकत्र येऊन सामुदायिक तबला वादन करून नवीन वर्षाचे स्वागत केले. यामध्ये भगवान राईतकर, शेख मलिक, गीत ठाकरे, आयुष महाजन, कल्पक रिंढे, गीता राईतकर, विधान बारड, शुभांगी लोढे, आदित्य म्हस्के, हार्दिक महाजन, गजानन म्हस्के आदी तबला साधकांनी सहभाग घेतला होता. यावेळी दादरा, केरवा, तीनताल, रूपक इत्यादी तालाचे एकपट, दुप्पट आणि विविध प्रकाराचे वादन करण्यात आले. या नवीन संगीतमय नववर्ष स्वागत पद्धतीचे शहरात कौतुक होत आहे. तसेच तबला वादन करून नववर्षाच्या स्वागताच्या या कार्यक्रमाला परिसरातील विद्यार्थी व तबला वादकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते.