लोणार शहरात 'श्रीं'च्या पालखीचे जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 14:38 IST2018-07-04T14:31:25+5:302018-07-04T14:38:52+5:30
‘गण गण गणात बोते' आणि विठुनामाचा जयघोष करीत सुलतानपूर येथील श्री गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी सायंकाळी शहरात आगमन झाले.

लोणार शहरात 'श्रीं'च्या पालखीचे जल्लोषात स्वागत
लोणार : ‘गण गण गणात बोते' आणि विठुनामाचा जयघोष करीत सुलतानपूर येथील श्री गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी सायंकाळी शहरात आगमन झाले. नगर परिषद गटनेते शांतीलाल गुगलीया तसेच माजी उपनगराध्यक्ष शेख समद शेख अहमद यांनी पालखी व वारकऱ्यांचे भक्तिभावात स्वागत केले . पंढरपूरला जाण्यासाठी सुलतानपूर येथून मंगळवारी दुपारी निघालेली पालखी लोणार येथे नगरसेवक प्रा.गजानन खरात यांचेकडे महाप्रसादासाठी मुक्कामी थांबली. पालखी बुधवारी सकाळीच पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे . या पालकीचे मंगळवारी शहरात आगमन होताच बसस्थानक चौकात पालकीचे स्वागत करण्यात आले. यावेळी ‘सुखसमृद्धी येऊ दे, पाऊस पडू दे' असे साकडे गटनेते शांतीलाल गुगलीया यांनी संत गजाजन महाराजांना घातले. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी नगराध्यक्ष भूषण मापारी, प्रकाश धुमाळ, बादशहा खान, साहेबराव पाटोळे, शहराध्यक्ष नितीन शिंदे,अरुण जावळे यांनीही श्रीचे दर्शन घेतले.