'धाडस' ग्रुप चे शारंगधर नगरीत स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:32 AM2021-03-25T04:32:58+5:302021-03-25T04:32:58+5:30
नागपूर ते रायगड असा ६७३ कि.मी.चा विविध विषयात जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा अनोखा प्रवास ही टीम करत आहे. 'धाडस' ...
नागपूर ते रायगड असा ६७३ कि.मी.चा विविध विषयात जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा अनोखा प्रवास ही टीम करत आहे. 'धाडस' ग्रुप छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मार्गातील गावागावात महिला सशक्तीकरण, वृक्षारोपण, जलसंवर्धन,स्वच्छता,गड किल्ले संवर्धन अशा विविध विषयात जनजागृती करत आहे, अशी माहिती धाडस ग्रुपच्या प्रमुख वर्षा घाटोळे यांनी दिली. मंगळवारी सायंकाळी या टीमचे श्री. शारंगधर बालाजी मंदिरात आगमन झाले होते. यावेळी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी टीमचे स्वागत केले. श्री.शारंगधर बालाजी संस्थांनचे अध्यक्ष दीपक पांडे यांच्या वतीने संस्थानतर्फे मॅनेजर हनुमंत देशमुख यांनी प्रतिमा देऊन टीमला शुभेच्छा दिल्या.भाजपा महिला मोर्चा माजी जिल्हा अध्यक्ष अर्चना पांडे यांनी आपल्या घरी टीमचे व्यवस्थापन केले होते. श्री.बालाजी संस्थानचे पुजारी यांनी धाडस टीमला मंदिराविषयी माहिती सांगितली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अभाविप महाराष्ट्र प्रदेश शोध कार्य सहसंयोजक अंबादास मेव्हणकर,सागर पांचाळ ,अजय जौंजाळ, सुदर्शन जवंजाळ ,विशाल शिंदे आदी विद्यार्थी उपस्थित होते.गावागावात टीमचे स्वागत करण्यात येत आहे. १२ सदस्यांची ही टीम १ एप्रिलला रायगडावर पोहचणार आहे.