सुलतानपुरात श्रींच्या पालखीचे स्वागत
By Ram.deshpande | Published: July 26, 2017 12:46 AM2017-07-26T00:46:32+5:302017-07-26T19:00:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सुलतानपूर : पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात निघालेल्या शेगावीचा राणा संत गजानन महाराजांच्या पालखीचे २५ जुलै रोजी सकाळी गण गण गणात बोतेच्या गजरात सुलतानपूर येथे आगमन झाले. यावेळी सुलतानपूरसह परिसरातील पारडी, बोरखेडी, धानोरा, अंजनी खु., शिवणीपिसा, भानापूर, राजनी यासह आदी गावातील भाविकांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले.
सुलतानपूर येथे पालखीचे आगमन झाले, यावेळी ग्रामपंचायतच्यावतीने सरपंच गजानन भानापुरे यांनी श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत केले. यावेळी गावाला यात्रेचे स्वरूप आले होते. गावातील भाविकांनी वारकºयांच्या सेवेसाठी नाश्ता, जेवणासह इतरही सेवा उपलब्ध करून दिल्या होत्या. दरम्यान, महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पंचक्रोशितील भाविक, टाळकरी, वारकरी, दिंड्या या पालखीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी दिलीपराव वाघ, पं.स.सदस्य डॉ.हेमराज लाहोटी, वामनराव झोरे, सलीमखा पठाण, आशा झोरे, ग्रा.पं.सदस्य संतोष पाटील, प्रकाश भानापुरे, बाळु पाटील, सागर पनाड, सुभाष खेत्रे, मदन पिसे, मिलिंद पिंपरकर, अभिमन्यू भानापुरे आदींनी श्रींचे पूजन करून दर्शन घेतले आणि श्रींची पालखी मेहकरकडे मुक्कामसाठी मार्गस्थ झाली.