आत्मबोधातच जीवाचे कल्याण- श्रीरंग महाराज बाहेगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:30 AM2021-02-05T08:30:30+5:302021-02-05T08:30:30+5:30

विवेकानंद जयंती महोत्सवात मंगळवारी सकाळी १० वाजता सादर केलेल्या प्रवचनात ते बाेलत हाेते. माणूस जन्माने श्रेष्ठ -कनिष्ठ नसून ...

Welfare of the soul in self-realization- Shrirang Maharaj Bahegaonkar | आत्मबोधातच जीवाचे कल्याण- श्रीरंग महाराज बाहेगावकर

आत्मबोधातच जीवाचे कल्याण- श्रीरंग महाराज बाहेगावकर

Next

विवेकानंद जयंती महोत्सवात मंगळवारी सकाळी १० वाजता सादर केलेल्या प्रवचनात ते बाेलत हाेते. माणूस जन्माने श्रेष्ठ -कनिष्ठ नसून आत्मभानाची जागृती झालेला जीव परमेश्‍वर प्राप्तीकडे त्याचा ओढा निर्माण होता. स्वामी विवेकानंदांनी उठा, जागे व्हा हे त्याच अर्थाने केलेले आवाहन आहे. निद्रेतून जागे व्हा या आभासी जगाच्या पलीकडे आत्मभान नावाची शक्तीची जाणीव झाल्यावर ध्येयसिध्दी निश्‍चित प्राप्त होते. स्वामीजी योध्दा संन्यासी होते. त्यांच्या जयंतीनिमित्त संपन्न होणारा हा उत्सव व शुकदास महाराजांनी सुरू केलेल्या मानवसेवेच्या या पथावर सर्वसामान्य माणसाला अग्रेसर केल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगितले. आज विवेकानंद जयंतीला मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन व प.पू.शुकदास महाराजांच्या समाधीचे विधियुक्त मंत्रोच्चारात पूजन करण्यात आले. आसक्तीने परमेश्‍वर प्राप्ती शक्य नाही. निरासक्त भावनेने केलेले कोणतेही कर्म परमेश्‍वराला प्राप्त होते. साधूच्या संगतीत व्यतीत केल्याने जीवनाची सार्थकता होते, असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगितले.

Web Title: Welfare of the soul in self-realization- Shrirang Maharaj Bahegaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.