बळीराजाच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द- फुंडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 02:03 PM2017-08-16T14:03:31+5:302017-08-16T14:03:31+5:30
बुलडाणा : राज्याच्या संपन्नतेमध्ये शेती क्षेत्राचा वाटा बहुमोल आहे.
त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखी व समाधानी असायला पाहीजे. बळीराजाच्या
कल्याणासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कुठल्याही
संकटामध्ये शासन शेतकºयांना वाºयावर सोडणार नाही, अशी ग्वाही राज्याचे
कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.
भारतीय स्वातंत्र्याचा ७० व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर
जिल्ह्याला संबोधित करताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी आमदार
हर्षवर्धन सपकाळ, आमदार राहूल बोंद्रे, जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताई
तायडे, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार धृपदराव सावळे, नगराध्यक्ष
श्रीमती नजमुन्नीसा मो. सज्जाद, जि.प सभापती श्रीमती श्वेताताई महाले,
जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.
षण्मुखराज, जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना आदींची उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराज कृषि सन्मान योजना अंमलात आणून शासन
शेतकºयांच्या कल्याणासाठी काम करत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, या
योजनेनुसार दीड लाख रूपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले आहे. या
योजनेचा सर्वात जास्त लाभ बुलडाणा जिल्ह्यातील शेतकºयांना झाला आहे.
जिल्ह्यात दीड लाखापर्यंत पीक कर्ज असलेल्या १ लक्ष ७० हजार ८५०
शेतकºयांच्या ९१३.२७ कोटी रूपयांच्या कजार्ला माफी मिळाली आहे. तसेच दीड
लाखावर कर्ज असलेल्या ४ हजार ९८० शेतकºयांना ११८.६१ कोटी रूपयांची
कर्जमाफी एकरकमी भरणा केल्यानंतर मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी
शेतकºयांनी जास्तीत जास्त संख्येने अर्ज भरावे. अर्ज भरण्याची प्रक्रिया
आॅनलाईन असून ३१ आॅगस्ट २०१७ पर्यंत अर्ज भरावे. राज्य शासनाने
राज्यातील शेतकºयांना दिलासा देण्यासाठी हमीभावाने तुर खरेदीचा निर्णय
घेतला. भाव स्थिरता आणि बाजार हस्तक्षेप योजना अंमलात आणली. या
योजनेतंर्गत जिल्ह्यात १३ खरेदी केंद्रावर ४९ हजार ८११ शेतकºयांची एकुण
८. ८९ लक्ष क्विंटल तुर खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीपोटी
शेतकºयांच्या खात्यात ४२८.३८ लक्ष रूपयांचे चुकारे जमा करण्यात आलेले
आहे.