बुलडाणा : विहिरी, तलाव ‘ओव्हर फ्लो’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 03:05 PM2020-09-20T15:05:22+5:302020-09-20T15:05:49+5:30

शनिवार पासून रविवारी सकाळपर्यंतच्या गेल्या २४ तासामध्ये बुलडाणा तालुक्यात 

Wells, lakes ‘overflow’! | बुलडाणा : विहिरी, तलाव ‘ओव्हर फ्लो’!

बुलडाणा : विहिरी, तलाव ‘ओव्हर फ्लो’!

Next

बुलडाणा: तालुक्यात शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे जलपातळीत चांगलीच वाढल झाली आहे. या पावसामुळे विहिरी, तलाव ओव्हर फ्लो झाले  आहेत. शनिवार पासून रविवारी सकाळपर्यंतच्या गेल्या २४ तासामध्ये बुलडाणा तालुक्यात २२.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 
जिल्ह्यात कोठे ना कोठे दररोज दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तलाव, लघुसिंचन प्रकल्प, धाड, मासरूळ, देऊळघाट या परिसरातील लहान-मोठे तलाव  ओसांडून वाहत आहेत. येळगाव धरणही पूर्ण क्षमतेने भरल्याने तालुक्?यातील भूजलपातळीत कमालीची वाढ झाली आहे. गतवषीं पावसाळा जरी जून महिन्यात सरू झाला तरी  आॅक्टोबरमध्ये पावसाने धरणे,  तत्नाव तुडुंब भरले होते. मात्र, यंदा सप्टेंबरमध्येच तालुक्?यातील बहुसंख्य नाले तुडुंब भरून वाहत आहेत. विहिरींची पाणीपातळी बरीच वर आली  आहे. तीन-चार वर्षांपूर्वी निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाने दांडी मारल्याने अनेक शेतकºयांच्या फळबागा पाण्याअभावी पूर्णपणे वाळून गेल्या होत्या. शेतकºयांनी विहिरींना  पाणी व सिंचनाकरिता लाखो रुपयांचा खर्च केला होता. काही फळबाग उत्पादक शेतकºयांनी लाखो रुपये पाण्यासाठी खर्च करून टँकरद्वारे पाणी मागवून फळबागा  वाचविण्याच्या प्रयत्न केला होता. बुलडाणा शहराला येळगाव धरणावरून पाणी पुरवठा करण्यात येतो. सोबतच परिसरातील अनेक गावांनाही याच धरणावरून पाणी दिल्या  जाते. परंतू दरवर्षी तालुक्यातील भादोला, सुंदरखेड, देऊळघाट आदी गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागते. सध्याही काही गावांमध्ये  तर आठवडा किंव पंधरा दिवसांनी ग्रापपंचायतीच्यावतीने पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र आता पाऊस चांगला झाल्याने भविष्यातील पाणी टंचाईचा प्रश्न दूर झाल्याचे  दिलासादायक चित्र बुलडाणा तालुक्यात दिसून येत आहे.
 
गत महिन्यातच येळगाव धरण झाले होते ओव्हर फ्लो

यंदा रोहिणी नक्षत्रापासूतच बुलडाणा तालुक्?यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने यंदाच्या यर्षी तरी नागरिकांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागणार नाही, असे चित्र  आहे. तालुक्यातून उगम असलेली महत्त्वाची पैनगंगा नदी मागील महिन्यापासून चांगली वाहत आहे. शिवाय येळगाव धरणही लवकरच ओव्हर फ्लो झाले. आगामी पीक नियोजनासाठी फायदा बुलडाणा तालक्यातील बहुतांश शेती ही सिंचनावर  अवलंबून आहे. या परिसरातील शेतकरी खरीप व रब्बी हंगामातील पिके मोठ्या प्रमाणावर घेतात. हल्ली दररोज पाऊस  कोसळत असल्याने सोयाबीन पीक वगळता इतर पिकांची परिस्थिती चांगली आहे. समाधानकारक पाऊस कोसळत असल्याने व विहिरींना मुबलक पाणी असल्याने आगामी  हंगामातील पीक नियोजन चांगले करता येणार आहे.

Web Title: Wells, lakes ‘overflow’!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.