अंढेरा येथील शाळेच्या विकासासाठी व्हॉट्स ग्रुपचा पुढकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 04:25 PM2017-12-19T16:25:44+5:302017-12-19T16:28:02+5:30
अंढेरा : व्हॉट्स ग्रुपव्दारे एकत्र आलेल्या तरूणांनी विद्यार्थी विकास बचत गटाची स्थापना करून आर्थिक व श्रमदान करून अवघ्या तिन दिवसात गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे.
अंढेरा : व्हॉट्स ग्रुपव्दारे एकत्र आलेल्या तरूणांनी विद्यार्थी विकास बचत गटाची स्थापना करून आर्थिक व श्रमदान करून अवघ्या तिन दिवसात गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. यावेळी व्हॉट्स ग्रुपच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची एक खोली दुरुस्ती करुन डिजिटल केली आहे.
एकदा बाहेर पडलेली पावलं परत शाळेकडे कशी वळतील ही चिंता सगळ्याच शाळांना असते. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून पिंप्री खंदारे गावातील तरुणांनी एक ग्रृप तयार केला. त्यामध्ये गावातून नोकरीधंद्यासाठी बाहेरगावी स्थायिक असलेल्यांशी संपर्क करून त्यांनाही या ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. राजु केंद्रे यांनी गावातील अशा तरुणांशी संपर्क करून व्हॉट्स अॅपवर हा ग्रुप विद्यार्थी विकास बचत गट नावाने निर्माण केला. यात सुमारे ६० सदस्य एकत्र आले. त्यानंतर आपल्या हातून चांगले उपक्रम पार पाडायचे यासाठी या तरूणांनी प्रत्यक्षात अंमलबजावणीला सुरूवात केली. ३० युवकांनी विद्यार्थी विकास निधी म्हणून ३० हजार रुपये जमा केले असुन, यातून सुरूवातीला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका वर्गखोलीला दुरूस्त करुन, बोलक्या भिंतीचा उपक्रम राबविण्यात आला. त्यानंतर एकलव्य गृपच्या माध्यमातून शाळेला प्रोजेक्टर मिळाल्याने शाळा डिजिटल सुद्धा झाली आहे. विद्यार्थी विकास बचत गटाचे अध्यक्ष शिवहरी ढाकणे, सचिव बबन गवई, ग्राम-विकास दुत राजु केंद्रे, गजानन वाघ, भूषण पवार, भास्कर पवार, भास्कर ऊबाळे, बंडु ऊबाळे, अतिश गवई, शिवहरी ढाकणे, परमेश्वर उगलमुगले, पांडुरंग गिरके, देविदास सोनुने, शिक्षक तागवले, शिक्षक सोनुने, विष्णू विटकर, पांडुरंग कांबळे, पेंटर धुमाळ, बाळु इंगळे यांनी तिन दिवस शाळेतील वर्गखोलीसाठी श्रमदान केले. अनेक पदांवर काम करणारे हे तरुण आपल्या कुवतीनुसार दरमहा गावाच्या विकासासाठी पैसा पाठवतात. त्यातून गावातील प्राथमिक शाळेची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच शाळेची रंगरंगोटी करण्यात आली आहे. या तरूणांच्या या पुढकारामुळे शाळेचा कायापालट दिसून येत आहे.
ग्रंथालयांसाठी पाच हजार पुस्तके
महाराष्ट्रात गाव तिथे ग्रंथालय संकल्पनेवर काम करणाºया एकलव्य गृपवर समन्वयक राजु केंद्रे यांच्या माध्यमातून व ई-लर्निंगसाठी प्रोजेक्टरची मदत झाली आहे. एकलव्याच्या माध्यमातून आतापर्यंत पाच जिल्ह्यात २५ गावात वाचनालये उभे राहण्यासाठी ५००० पुस्तके देण्यात आली आहेत, व ५ शाळा डिजिटल करण्यासाठी प्रोजेक्टर व इ-लर्निंग साहित्याची मदत करण्यात आली आहे .