गव्हाच्या उत्पादनात होणार २५ टक्क्याने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 01:43 PM2019-12-31T13:43:22+5:302019-12-31T13:43:30+5:30

गहू पेरणी १५ नोव्हेंबरनंतर म्हणजे उशीराने केली गेल्याने यंदा गव्हाच्या उत्पादनात २५ टक्के घट येण्याची साधार भिती व्यक्त होत आहे.

Wheat production will decline by 25% | गव्हाच्या उत्पादनात होणार २५ टक्क्याने घट

गव्हाच्या उत्पादनात होणार २५ टक्क्याने घट

Next

- ब्रम्हानंद जाधव 
बुलडाणा: जिल्ह्यात रब्बी पेरणी ८३ टक्क्यापर्यंत पोहचली आहे. त्यामध्ये गहू पेरा नियोजित क्षेत्रापेक्षा निम्म्यावरच आहे. त्यातही गहू पेरणी १५ नोव्हेंबरनंतर म्हणजे उशीराने केली गेल्याने यंदा गव्हाच्या उत्पादनात २५ टक्के घट येण्याची साधार भिती व्यक्त होत आहे. अतीवृष्टीने रब्बी हंगामाच्या पेरणीस विलंब लागल्याचा फटका बऱ्याच पिकांना बसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

रब्बी हंगामामध्ये गहू पीक हे अत्यंत महत्त्वाचे समजल्या जाते. इतर उत्पादनाच्या तुलनेत गव्हाची मागणीही सर्वाधिक असते. त्यामुळे बागायतदारांपाठोपाठ कोरडवाहू शेतकरीही गव्हाची पेरणी करतात. परंतू यंदाच्या रब्बी हंगामातील गहू पिकाचे नियोजनच कोलमडले. खरीप हंगाम अंतीम टप्प्यात असताना अतिवृष्टीचा जोर वाढला. त्यामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले. अतिपावसाने रब्बी हंगामावर संकट आले. रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी बहुतांश शेतामध्ये शेती मशागतही होऊ शकली नाही. परिणामी रब्बी हंगाम लांबला. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र १ लाख ५७ हजार ७६० हेक्टर आहे. त्यापैकी ८३ टक्के म्हणजे १ लाख ३० हजार ९४२ हेक्टर पेरणी करण्यात आली आहे. बागायती शेतीमध्ये गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात होणे चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाची असते.
उशिरा पेरणी १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत करू शकतात. बागायती गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबरनंतर उशिराने केल्यास प्रत्येक पंधरवड्यात गव्हाचे उत्पादन हेक्टरी २.५ क्विंटल एवढे घटते.
तर जिरायत गव्हाची पेरणी आॅक्टोबरच्या दुसºया पंधरावड्यातच करावी लागते; परंतू यंदा गव्हाची पेरणी विलंबाने झाल्यामुळे हेक्टरी २.५ क्विंटलची घट शेतकºयांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरासरीपेक्षा निम्म्यावर पेरा
जिल्ह्यात गहू पिकाचे सरासरी क्षेत्र ६६ हजार ५०३ हेक्टर आहे. परंतू आतापर्यंत २८ हजार ६१४ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात गहू पिकाचा पेरा सरासरीपेक्षा ४३ टक्के म्हणजे निम्म्यावर आला आहे.


मुळकुजव्या रोगामुळे हानी
गहू पिकास थंड व कोरडे हवामान चांगले मानवते. मात्र सध्या हवामानात वेळोवेळी होणाºया बदलाचा फटका गहू पिकाला बसत आहे. धुक्यामुळे गहू पिकांना फुटवे कमी येत आहेत. त्यात आता ढगाळ वातावरणाने रोपांची मुळकुजव्या रोगामुळे हानी होत आहे.

 

 

 

Web Title: Wheat production will decline by 25%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.