कुटुंबातील तरुणांचे लसीकरण कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:36 AM2021-05-21T04:36:07+5:302021-05-21T04:36:07+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण ज्येष्ठ १,३५,१२५ ४५ ...
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण
ज्येष्ठ १,३५,१२५
४५ ते ६० वयोगट १,२१,८७९
१८ ते ४४ ४५,७४०
तरुण कामानिमित्त बाहेर जातात, त्यांनाही लवकर लस मिळावी !
लसींच्या उपलब्धतेकडे आरोग्य विभागाने लक्ष द्यावे. अनेकांनी लस घेण्यासाठी नोंदणी केलेली आहे. परंतु मध्येच लसीकरण बंद करण्यात आले. त्यामुळे तरुणांना लस केव्हा मिळणार.
शिवाजी घोंगडे
कोरोना लसीकरण मोहीम जोरात सुरू झाली होती. परंतु मध्येच केंद्र बंद पडल्याने अनेकांना लस मिळाली नाही. सध्या तरुणवर्गही लस घेण्यासाठी वारंवार केंद्रावर चकरा मारत आहेत.
गजानन कंकाळ
तरुण कामानिमित्त बाहेर जातात त्यामुळे त्यांनाही लवकरात लवकर लस मिळणे आवश्यक आहे. तरुणांसाठी तातडीने ही मोहीम सुरू करावी व जास्तीत जास्त डोस प्रत्येक लसीकरण केंद्रावर उपलब्ध करून द्यावे.
कृष्णराव देशमुख