पाटी-पेन्सिल धरणारे हात भीक मागू लागतात तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:41 AM2021-09-09T04:41:28+5:302021-09-09T04:41:28+5:30
बसस्थानक... शहरातील बसस्थानक परिसरात ५ ते १० वयोगटातील काही मुले भीक मागताना दिसतात. या ठिकाणी प्रवाशांकडून पैशांची मागणी करत ...
बसस्थानक...
शहरातील बसस्थानक परिसरात ५ ते १० वयोगटातील काही मुले भीक मागताना दिसतात. या ठिकाणी प्रवाशांकडून पैशांची मागणी करत हात पुढे करतात. लहान मुलांच्या कोवळ्या, चेहऱ्यावरील भाव पाहून अनेकजण पैसेही देतात. विशेषत: शहरातील हॉटेलसमोरही मुले पैसे मागताना दिसतात.
कारंजा चौक...
बुलडाणा शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या व नेहमी गर्दीचे ठिकाण कारंजा चौक परिसरात अनेकदा लहान मुले भीक मागताना दिसतात. एखादी वस्तू खरेदी करणाऱ्या नागरिकांकडून पैशांची मागणी करतात. इतर जिल्ह्यातून अनेकजण येत असून भीक मागत आहेत. काही मुलांच्या सोबत त्यांची आईही राहत असते.
शहरात भीक मागणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. कोरोनामुळे तर अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे लहान मुलांद्वारे भीक मागण्याचे प्रपाण वाढले आहे. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे.
-जिजा राठोड
एकीकडे श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, तर गरीब अधिक गरीब होत आहेत. गोरगरिबांच्या मुलांसाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध असल्या तरी त्यांच्यापर्यंत ते पोहचत नाहीत. केवळ पोटासाठी त्यांना भीक मागण्याची वेळ येत आहे.
-अशोक काकडे