#खामगाव कृषि महोत्सवात सोमवारी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ महानाट्यप्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 23:52 IST2018-02-18T23:52:15+5:302018-02-18T23:52:34+5:30
खामगाव: पॉलिटेक्निक ग्राउंडवर सुरू असलेल्या कृषी महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे. या उत्सवाला राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, आमदार अँड. आकाश फुंडकर, नगराध्यक्ष अनिता डवरे यांची प्रमुख उपस्थिती राहील.

#खामगाव कृषि महोत्सवात सोमवारी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ महानाट्यप्रयोग
खामगाव: पॉलिटेक्निक ग्राउंडवर सुरू असलेल्या कृषी महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे. या उत्सवाला राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, आमदार अँड. आकाश फुंडकर, नगराध्यक्ष अनिता डवरे यांची प्रमुख उपस्थिती राहील. शिवजयंतीनिमित्त भाजप आमदार अँड. आकाश फुंडकर यांच्या वतीने खास आयोजित रायगडाला जेव्हा जाग येते.. या विशेष महानाट्य प्रयोगाचा शिवप्रेमींनी लाभ घ्यावा. महानाट्याचा प्रयोग रात्री ८ ते १0 वाजेपर्यंत होणार आहे.