विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लूट कधी थांबणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:24 AM2021-07-15T04:24:12+5:302021-07-15T04:24:12+5:30
----आरक्षणाची सक्ती बंद करायला हवी--- आरक्षणाची सक्ती आता तरी बंद करायला हवी. कामानिमित्त बऱ्याचदा बाहेरगावी जावे लागते. केवळ आरक्षण ...
----आरक्षणाची सक्ती बंद करायला हवी---
आरक्षणाची सक्ती आता तरी बंद करायला हवी. कामानिमित्त बऱ्याचदा बाहेरगावी जावे लागते. केवळ आरक्षण असलेल्यांनाच डब्यात प्रवेश दिला जातो. त्यामुळे किमानपक्षी आरक्षणाची सक्ती कमी करून सुरू असलेल्या रेल्वे गाड्यांना जनरलचे डबे जोडण्यात यावेत.
(संजय पानट, प्रवासी, मलकापूर)
--
आरक्षित डब्यात ७२ प्रवासी चालू शकतात, मग जनरल डब्यातही प्रवाशांची गर्दी का चालू नये? तसेही सध्या सुरू असलेल्या रेल्वे गाड्यांमधील गर्दी पाहता या निर्णयाचा फारसा लाभ होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विशेष गाड्यांनाही जनरल डबा लावला जावा. रेल्वे बोर्ड तथा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या स्तरावर याबाबत निर्णय होणे गरजेचे झाले आहे.
(ॲड. महेंद्रकुमार बुरड, अध्यक्ष, जिल्हा प्रवासी (सेवा) संघ, मलकापूर)
--या रेल्वे जातात जिल्ह्यातून--
हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस, नवजीवन एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, आझाद हिंद, गीतांजली, बिकानेर-सिकंदराबाद, द्वारका एक्स्प्रेस, गांधीधाम-पुरी, हमसफर एक्स्प्रेस, मुंबई-हावडा, ओखा-पुरी, अहमदाबाद-पुरी