गृहविलगीकरणातील रुग्णांच्या घरातील कचरा जातो कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:32 AM2021-04-15T04:32:52+5:302021-04-15T04:32:52+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात मार्च महिन्यांपासून काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत आहे़ लक्षणे नसलेल्या काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांना हाेम क्वारंटाईनची ...

Where does household waste patient waste go? | गृहविलगीकरणातील रुग्णांच्या घरातील कचरा जातो कुठे?

गृहविलगीकरणातील रुग्णांच्या घरातील कचरा जातो कुठे?

Next

बुलडाणा : जिल्ह्यात मार्च महिन्यांपासून काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत आहे़ लक्षणे नसलेल्या काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांना हाेम क्वारंटाईनची सुविधा देण्यात येते़ हाेम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात आहे़ या रुग्णांच्या घरातील कचरा गाेळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाच नाही़ त्यामुळे, कचरा संकलन करणाऱ्यांचा जीव धाेक्यात आला आहे़

बुलडाणा शहरात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ लक्षणे नसलेल्या काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांना सुविधा असल्यास हाेम क्वारंटाईन राहण्याची सवलत देण्यात येत आहे़ हाेम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांची संख्या माेठी आहे़ या रुग्णांच्या घरातून निघणारा कचरा गाेळा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाच नसल्याचे चित्र आहे़ बुलडाणा शहरात नगरपालिकेच्या वतीने जवळपास २५ घंटा गाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलित करण्यात येताे़ या घंटागाड्यांवर असलेल्या चालकांना अनेक वेळा कचरा हाताळावा लागताे़ हाेम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांच्या घरातून निघणारा कचराही संकलित घंटागाड्यांमध्येच संकलित करण्यात येताे़ त्यामुळे, कचरा संकलित करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संसर्ग हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही़

कचऱ्यातून काेराेना पसरू शकताे

बुलडाणा शहरासह ग्रामीण भागात अनेक रुग्ण हाेम क्वारंटाईन आहेत़

हाेम क्वारंटाईन रुग्णांचे मास्क व इतर कचऱ्यावर काेराेनाचे विषाणू राहतात़

या कचऱ्याला निराेगी व्यक्तीने हाताळल्यास त्याला संसर्ग हाेण्याची भीती नाकारता येत नाही़

कंटोनमेंट झाेन व हाेम क्वारंटाईनचे पाटी लावण्यात आली नसल्याने रुग्णांविषयी माहितीच मिळत नाही़

हाेम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांच्या घरातील कचरा संकलित करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था हवी़

स्वतंत्र व्यवस्था करणे अशक्य

हाेम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांच्या घरातून मुळात फार कमी कचरा निघताे़ तसेच एका वाॅर्डात हाेम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांची संख्या कमी असते़ त्यांच्यासाठी स्वतंत्र कचरा संकलित करण्याची व्यवस्था करणे नगरपालिकेला परवडणारा नसल्याचे सूत्रांनी सांगितले़

कचरा संकलित करणारे कर्मचारी

३०

११० टन ओला कचरा

८० टन सुका कचरा

Web Title: Where does household waste patient waste go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.