लाच स्वीकारताना हवालदाराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 01:03 AM2017-09-29T01:03:05+5:302017-09-29T01:03:05+5:30
बुलडाणा : गुन्हय़ाचा तपास पूर्ण करून त्वरित चार्जशीट पाठविण्याकरिता पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना बुलडाणा पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबलला लाचलुचपत खात्याच्या पथकाने गुरुवारी दुपारी अटक केली.
बुलडाणा : गुन्हय़ाचा तपास पूर्ण करून त्वरित चार्जशीट पाठविण्याकरिता पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना बुलडाणा पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबलला लाचलुचपत खात्याच्या पथकाने गुरुवारी दुपारी अटक केली.
तक्रारदार व त्यांच्या भावांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्हय़ाचा तपास पूर्ण करून लवकर चार्जशिट पाठविण्यासाठी तसेच दवा खान्यामध्ये पत्रव्यवहार करून वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन ३२६ कलम समाविष्ट करण्यासाठी पोलीस स्टेशन बुलडाणा शहरचे जमादार लक्ष्मण जाधव यांनी ५000 रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली. सदर तक्रारीनंतर पडताळणी कार्यवाहीमध्ये लक्ष्मण धोंडूजी जाधव यांनी ५000 रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष केल्याचे स् पष्ट झाले. त्यानंतर लक्ष्मण धोंडूजी जाधव याने तक्रारदाराकडून पोलीस स्टेशन बुलडाणा शहरपासून १00 फूट अंतरावर असलेल्या प्रियंका आईस्क्रीम अँण्ड स्नॅक्स या हॉटेलमध्ये लाचेची रक्कम ५000 रुपये पंचासमक्ष स्वीकारली. यावेळी जाधवला अटक करण्यात आली. तसेच त्याच्याविरुद्ध कलम ७, १३(१)(ड) सह १३ (२) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सन १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरूआहे. सदर कार्यवाही अँन्टी करप्शन ब्यूरो अमरावतीचे पोलीस अधीक्षक o्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अँन्टी करप्शन ब्यूरो अमरावती सुनील नाशीककर, पोलीस उप-अधीक्षक शैलेश प्र.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एस.बी.भाईक, श्याम भांगे, रवींद्र लवंगे, संजय शेळके, विलास साखरे, विजय वारुळे यांनी पार पाडली.