ATM मधून पैसे काढताना मदतीच्या बहाण्याने शेतकऱ्याची ४० हजाराची केली फसवणूक

By अनिल गवई | Published: September 7, 2022 06:55 PM2022-09-07T18:55:42+5:302022-09-07T18:56:23+5:30

मदतीच्या बहाण्याने दोन अज्ञात व्यक्तींनी शेतकऱ्याची 40 हजार रूपयांची फसवणूक केली.

While withdrawing money from the ATM, he cheated the farmer of 40,000 on the pretext of help | ATM मधून पैसे काढताना मदतीच्या बहाण्याने शेतकऱ्याची ४० हजाराची केली फसवणूक

ATM मधून पैसे काढताना मदतीच्या बहाण्याने शेतकऱ्याची ४० हजाराची केली फसवणूक

googlenewsNext

खामगाव:  एटीएममधून पैसे काढताना अडकलेले एटीएम कार्ड काढून देण्यासाठी मदतीच्या बहाण्याने दोघांनी एका शेतकऱ्याची ४० हजाराची फसवणूक केली. शहरातील नांदुरा रोडवरील एटीएममध्ये मंगळवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी शेतकऱ्याच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घडलेला सर्वप्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

तालुक्यातील सुजातपूर येथील शेतकरी अनिल हरी खडसे (५८) व प्रफुल चौधरी मंगळवार ६ सप्टेंबर रोजी शहरात आले होते. दुपारी ३.३० वाजता दरम्यान नांदुरा रोडवरील कॅनरा बँकेच्या एटीएम मधून पैसे काढत असताना एटीएम कार्ड मशीन मध्ये अडकले होते. त्यामुळे प्रफुल चौधरी बॅक व्यवस्थापकांकडे तक्रार करण्यास गेले. दरम्यान, त्यांच्या पाठीमागे असलेल्या दोघांनी एटीएममध्ये अडकलेले एटीएम कार्ड काढून देतो, असे सांगत मदतीचा बहाणा केला. एकाने खडसे यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. त्याचवेळी दुसऱ्याने त्यांच्या एटीएमचा वापर करून खात्यातून चार वेळा प्रत्येकी दहा हजार अशी चाळीस हजार रुपयांची रक्कम काढली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच शेतकरी अनिल खडसे यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे शहर पोलीसांनी दोन अज्ञात आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजवरून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

While withdrawing money from the ATM, he cheated the farmer of 40,000 on the pretext of help 
 

Web Title: While withdrawing money from the ATM, he cheated the farmer of 40,000 on the pretext of help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.