खामगाव तालुक्यातील बोरी अडगावमध्ये आढळला पांढरा कावळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 07:00 PM2021-06-03T19:00:06+5:302021-06-03T19:00:31+5:30

A white crow was found : गत काही दिवपसांपासून निदर्शनास येत असलेल्या पांढºया कावळ्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

A white crow was found in Bori Adgaon in Khamgaon taluka | खामगाव तालुक्यातील बोरी अडगावमध्ये आढळला पांढरा कावळा 

खामगाव तालुक्यातील बोरी अडगावमध्ये आढळला पांढरा कावळा 

Next

- सचिन बोहरपी
बोरीअडगाव: खामगाव तालुक्यातील बोरी अडगावात पांढरा कावळा आढळला आहे. या भागात गत काही दिवपसांपासून निदर्शनास येत असलेल्या पांढºया कावळ्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
बोरी अडगाव येथील शिवाजीराव पाटील यांच्या घराजवळ त्यांना एक वेगळाच पक्षी असल्याचे आढळले. कुतूहल म्हणून त्यांनी निरीक्षण केले. तेव्हा त्या पक्ष्याची ठेवण, चोच आणि डोळे कावळ्यासारखेच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचा आवाज ऐकल्यावर तो कावळाच असल्याची खात्री त्यांना पटली. त्यांनी ही बाब शेजारच्यांना सांगितली व त्यांनी छायाचित्रे, चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली. थोड्याच वेळात हे कुतूहल संपूर्ण परिसरात पसरले. कावळ्यांच्या समूहात दुसरा पक्षी आला की कावळे त्याला बोचून काढतात; मात्र हा पांढरा कावळा इतर कावळ्यांसह खाद्य खाण्यासाठी घराच्या जवळ निर्धास्त येताना सर्वांना दिसतो. पक्षीमित्रांनीही तो कावळाच असल्याचे स्पष्ट केले. पांढरा कावळा ही नवीन प्रजाती नसून आनुवंशिक स्थितीमुळे होणारे एक उत्परिवर्तन आहे. पक्षी प्राण्यांच्या शरीराचे रंगा विशिष्ट द्रव्यांमुळे ठरतात. ही रंगद्रव्ये मेलानिन, कॅरेटीनोईड आणि पॉरफिरीनसया प्रकारची असतात. या तीनही रंगद्रव्यांची कमी - जास्त किंवा पूर्णपणे कमतरता पक्ष्यांची रंगसंगती ठरवते किंवा बिघडवू शकते. यापेकी मेलानिन या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे पिसे पूर्ण पांढºया रंगाची होतात, असे पक्षीमित्र राहुल सुरवाडे यांनी सांगितले
 
अनुवंशिक स्थितीमुळे होणारे एक उत्परीवर्तन आहे. मेलानिन, कॅरेटीनोईड आणि पॉरफिरीनस या प्रकारची रंगद्रव्ये असतात. या तीनही रंगद्रव्यांची कमी-जास्त किंवा पूर्णपणे कमतरता पक्ष्यांची रंगसंगती ठरवते. यापैकी मेलानिनचा अभाव, हा अनुवंशिक बदल आहे. अशा पक्ष्याला ह्यल्युसिस्टिकह्ण म्हणतात. या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे पूर्ण पांढ?्या रंगाची पिसे असतात आणि डोळ्यातील रंगद्रव्य नसल्याने आतील लाल रंगाच्या केशिकांचाही रंग डोळ्यांना येऊन ते लाल दिसतात. या पक्ष्याची चोच आणि पायसुद्धा फिकट गुलाबी रंगाचे असू शकतात. एकूण पक्षीसंख्येत अशा पक्ष्यांचे प्रमाण कमी असते. या घटनेकडे विज्ञानाच्या दृष्टीने बघायला हवे.
- कौस्तूभ पांढरीपांडे
पक्षीमित्र

Web Title: A white crow was found in Bori Adgaon in Khamgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.