दाेन हजार हेक्टरावर उगवणार ‘पांढरे सोने’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:36 AM2021-05-09T04:36:02+5:302021-05-09T04:36:02+5:30
सुधीर चेके पाटील चिखली : तालुक्यात सोयाबीननंतर प्रमुख नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांची पसंती असलेल्या कापसाच्या पिकात सातत्याने नुकसान हाती ...
सुधीर चेके पाटील
चिखली : तालुक्यात सोयाबीननंतर प्रमुख नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांची पसंती असलेल्या कापसाच्या पिकात सातत्याने नुकसान हाती येत आहे़ त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षाच्या तुलनेत कापसाच्या लागवड क्षेत्रात घट होणार आहे. गतवर्षी अडीच हजार हेक्टरावर कापसाची लागवड झाली होती. मात्र, अतिवृष्टीचा कापसाला मोठा फटका बसला. त्यात अपेक्षित भाव न मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे यंदा केवळ दोन हजार हेक्टरवरच कापसाची लागवड होण्याची चिन्हे आहेत.
चिखली तालुक्यातील ९० हजार हेक्टर पेरणीयोग्य शेतजमिनीपैकी २०१६ पूर्वी सुमारे ८ हजार हेक्टरवर कापसाची लागवड केली जात होती. मात्र, कधी अतिवृष्टी, तर कधी कोरडा दुष्काळ, कापूस वेचणीचा वाढलेला दर, अशी स्थिती असूनही ऐनवेळी कापूस वेचणीस मजूर मिळत नाहीत, तसेच हमीभाव केंद्र वेळेत सुरू होत नाहीत. बोंडअळी आणि बोगस बियाणे आदी कारणांमुळे शेतकऱ्यांनी कापसाकडे पाठ फिरवल्याने सन २०१७ पासून कापूस लागवडीच्या क्षेत्रात सातत्याने घट होत आहे. त्यात गतवर्षी सरासरी लागवड क्षेत्रापेक्षा दीडपट अधिक कापसाचा पेरा झाला होता. मात्र, गत हंगामात अतिवृष्टीचा मोठा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला. वेचणीसाठी अतिरिक्त पैसे मोजूनही ऐनवेळी मजूरदेखील मिळत नव्हते. तथापि हमीभाव केंद्र वेळेवर सुरू झाले नाहीत. कापसात ओलावा असल्याचे कारण पुढे करीत व्यापाऱ्यांनी खेडा खरेदीतून शेतकऱ्यांची लूट केली. याचा विपरीत परिणाम यंदा लागवड क्षेत्रावर झाला असल्याने यंदा केवळ २,००० हेक्टरावर पांढरे सोने उगवण्याची चिन्हे आहेत. त्या अनुषंगाने कृषी विभागाने नियोजन केले आहे.
सुमारे १३ हजार बियाणे पाकिटांची आवश्यकता!
तालुक्यात नियोजित २ हजार हेक्टरावर लागवडीसाठी सुमारे १३ हजार कापूस बियाण्यांच्या पाकिटांची आवश्यकता भासणार आहे. यामध्ये बी.टी. बियाणे, सुधारित बियाणे व देशी बियाण्यांचा समावेश आहे.
दोन गावांत ‘एक गाव, एक वाण’ खरेदी केंद्रही
वेळेवर सुरू होत नसल्याने नुकसान होत असून,
साधारणपणे दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या घरात कापूस दाखल होतो. गतवर्षी दिवाळीतदेखील शासकीय खरेदी केंद्र सुरू होऊ शकले नाही. त्यात गतवर्षी जिल्ह्यात दोनच खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली. याचा फटकादेखील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याने शेतकरी कापसाकडे पाठ फिरवीत आहेत.