पांढरे सोने अज्ञात रोगाच्या विळख्यात
By admin | Published: September 12, 2014 12:14 AM2014-09-12T00:14:06+5:302014-09-12T00:14:06+5:30
खामगाव तालुक्यातील २७ हजार हेक्टरवरील कपाशीचे पीक धोक्यात.
खामगाव : पेरणीच्या सुरुवातीला कमी, तर आता अतिपाऊस, अशातच दमट व ढगाळ वातावरणाने कपाशीच्या पिकावर अज्ञात रोगाचे आक्रमण झाले आहे. यामुळे तालुक्यातील २७ हजार हेक्टरवरील कपाशीचे पीक धोक्यात आले आहे.
खामगाव तालुक्यात यावर्षी २७ हजार हेक्टर क्षेत्रावर क पाशीची लागवड झाली आहे. अत्यंत महागडे बीटी बियाणे तसेच महागडी खते, कीटकनाशके यामुळे कपाशीचा खर्च वाढ त आहे. सिंचनासाठी पाण्याची सुविधा उपलब्ध होती, अशा शे तकर्यांनी ११ हजार हेक्टर क्षेत्रावर ठिबकच्या पाण्यावर कपाशी फुलविली आहे.
मागील ८ ते १0 दिवसांपासून होत असलेल्या सततच्या पावसामुळे हिरवी असलेली कपाशीची झाडे सुकत असल्याचे दिसून आले. हिरवी पाने लालसर होऊन गळत आहे. काही ठिकाणी तर कपाशीला लागलेल्या बोंड्या वगळता इतर नवीन पालवीच येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.