ट्रीपल सीट वाहनचालकांना आवरणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:42 AM2021-09-09T04:42:03+5:302021-09-09T04:42:03+5:30
संदीप वानखडे बुलडाणा : ट्रिपल सीट वाहने चालविणे हा गुन्हा असला तरी अनेक जण सर्रासपणे ट्रिपल सीट वाहने चालवत ...
संदीप वानखडे
बुलडाणा : ट्रिपल सीट वाहने चालविणे हा गुन्हा असला तरी अनेक जण सर्रासपणे ट्रिपल सीट वाहने चालवत असल्याचे चित्र बुलडाणा शहरातील विविध चाैकांत असते़
१२८ कलमांन्वये अशा वाहनचालकांवर कारवाई होऊन त्यांना २५० रुपये दंड लावण्याची तरतूद सुरू आहे. शहरातील विविध चाैकांत वाहतूक पोलिसांच्यावतीने कारवाई करण्यात येत आहे. ट्रिपल सीट वाहन चालविणे, कर्णकर्कश आवाज करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे आदी प्रकार आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. अनेक पालक आपल्या अल्पवयीन मुलांना दुचाकीच्या चाव्या देतात़ ही अल्पवयीन मुले वाहतूक नियमांचे उल्लंघन करून सुसाट वाहने चालवितात़ वाहतूक पाेलिसांच्या वतीने वाहतूक नियमांचे पालन करण्याविषयी जनजागृती करण्यात येते तसेच नियम माेडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे़ ऑगस्ट महिन्यात वाहतूक शाखेच्यावतीने जिल्हाभरात ६०४ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून एक लाख २० हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे़
दुचाकी वाहनचालकांनाे हे नियम पाळा
वाहनचालकांनी हेल्मेट घालणे आवश्यक
विनापरवाना वाहन चालवू नये
लायसन्स जवळ बाळगावे
आरसी, इन्शुरन्स काढून घ्यावा
गाडी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने चालवू नये
ट्रीपलसीट गाडी चालवू नवे
गाडीचे सायलेन्सर आवाज देत असेल तर स्वच्छ ठेवावे
शहरात गाडीचा जो वेग दिला आहे त्याच वेगाने गाडी चालविणे
असा भरावा लागेल दंड...
हेल्मेट न घालणे ५००
लायसन्स नसणे २००
आरसी, इन्शुरन्स नसणे २०००
विरुद्ध दिशेने जाणे २००
ट्रीपल सीट जाणे २००
असा केला दंड वसूल
जानेवारी -४५७-८९४००
फेब्रुवारी -६०४-१२०८००
मार्च - ७१८-१४३६००
एप्रिल -१३९२-२७८४००
मे - १७५५ -३५१०००
जून - १२५४ -२५०८००
जुलै -७२७ -१४५४००
ऑगस्ट -६०४-१२०८००