वडिलांच्या जयंतीनिमित्त अख्खे गावच केले निर्जंतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:28 AM2021-05-03T04:28:32+5:302021-05-03T04:28:32+5:30
विजय मखमले यांची १ मे राेजी जयंती हाेती़ त्यांचे कुटुंबीय हा दिवस दरवर्षी गावात सामाजिक उपक्रम घेऊन साजरा ...
विजय मखमले यांची १ मे राेजी जयंती हाेती़ त्यांचे कुटुंबीय हा दिवस दरवर्षी गावात सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करतात़ परंतु, या वर्षी या कोरोना महामारीच्या संकटात गावाला यापासून वाचवण्यासाठी त्यांची तिन्ही मुले महेश, महेंद्र व मंगेश यांनी वडिलांच्या विचारधारेला धरून संपूर्ण गावच निर्जंतुक करून घेण्याचा निर्णय घेतला़ त्यांच्या या निर्णयाला संपूर्ण गाव व परिसरातील नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला. कोरोनाचे संकट लक्षात घेता त्यांच्या कुटुंबीयांनी या वर्षी संपूर्ण गाव व लगतचा परिसर व तसेच गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, बँका व शासकीय कार्यालये व खाजगी दवाखाने हे पूर्णपणे सॅनिटाइझ केले. दरवर्षी त्यांची मुले व कुटुंबीय असे उपक्रम राबवित असतात. यावेळी महेश मखमले, महेंद्र मखमले, मंगेश मखमले, श्रीपाद मखमले, गिरीश मखमले, प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी मोरे, शेख जलील, पांडू कापसे, कृष्णा पवार, अमोल देशमुख, भास्कर शिंदे, बाळू राठोड, अरविंद आडे, सिद्धू जायभाय, गोविंद देशमुख, संजू घुगे, नितीन चव्हाण, पवन दाभेरे, पशुवैद्यकीय कर्मचारी गणेशकर साहेब आदी उपस्थित होते.