पॅसेंजर रेल्वे अद्यापही ‘लॉक’ का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:38 AM2021-08-19T04:38:08+5:302021-08-19T04:38:08+5:30

--सहा पॅसेंजर सुरू होण्याची प्रतीक्षा-- मध्य रेल्वेंतर्गत सहा पॅसेंजर नागपूर-भुसावळ या मार्गावर धावतात. वर्धा-भुसावळ, नागपूर-भुसावळ, नरखेड-भुसावळ अशी त्यांची नावे ...

Why are passenger trains still 'locked'? | पॅसेंजर रेल्वे अद्यापही ‘लॉक’ का?

पॅसेंजर रेल्वे अद्यापही ‘लॉक’ का?

Next

--सहा पॅसेंजर सुरू होण्याची प्रतीक्षा--

मध्य रेल्वेंतर्गत सहा पॅसेंजर नागपूर-भुसावळ या मार्गावर धावतात. वर्धा-भुसावळ, नागपूर-भुसावळ, नरखेड-भुसावळ अशी त्यांची नावे आहेत. अप आणि डाऊन मिळून एकूण सहा पॅसेंजर आहेत. मात्र, प्रदीर्घ कालावधीपासून त्या बंद आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना अडचण जात आहे.

--या एक्स्प्रेस आहेत सुरू--

हावडा-अहमदाबाद, नवजीन एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, आझाद हिंद, गीतांजली, बिकानेर-सिकंदराबाद, द्वारका एक्स्प्रेस, गांधीधाम-पुरी यासह आणखी चार एक्स्प्रेस धावत आहेत. या रेल्वेगाड्यांत तिकिटाची जुनीच समस्या कायम आहे.

--रेल्वेचा स्पेशल प्रवास परवडेना--

एक्स्प्रेस रेल्वेचे भाडे अधिक आहे. आम्ही नियमित अप-डाऊन करणारे आहोत. त्यामुळे किमान आम्हाला तरी आता परिस्थिती पूर्ववत होत असताना मुंबईतील लोकलप्रमाणे पासेसची सुविधा उपलब्ध करण्यात यावी. सोबतच पॅसेंजर रेल्वेही सुरू केल्यास आम्हाला ये-जा करणे अधिक सुलभ होईल. आम्हीही लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.

(सुभाष मुळे, मलकापूर)

Web Title: Why are passenger trains still 'locked'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.