शिक्षकांचेच पगार उशिरा का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:34 AM2021-05-14T04:34:03+5:302021-05-14T04:34:03+5:30
महिन्याच्या १२ ते १५ तारखेला हाेतो पगार महिन्याच्या १ तारखेला शिक्षकांचा पगार करण्याची मागणी असतानाही वेळेवर पगार होत नाहीत. ...
महिन्याच्या १२ ते १५ तारखेला हाेतो पगार
महिन्याच्या १ तारखेला शिक्षकांचा पगार करण्याची मागणी असतानाही वेळेवर पगार होत नाहीत. जिल्ह्यातील शिक्षकांना १२ ते १५ तारखेला पगार मिळतात. मात्र, सध्या मार्चपासून पगारच मिळाला नसल्याची माहिती शिक्षकांनी दिली आहे. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणी येतात.
वेळेवर पगाराचा प्रश्न कायम
शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार मेची १० तारीख उलटली तरी झालेले नाहीत. कोविडच्या पार्श्वभूमीवर पगार उशिरा होत आहेत. मात्र, याचा फटका जिल्हा परिषद शिक्षकांना बसत आहे. वेळेवर पगार करण्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे.
जिल्ह्यातील जि. प. शाळा - १४३८
एकूण शिक्षक - ६८७२
घराचे हप्ते वेळेवर कसे फेडणार?
अनेक शिक्षकांचे घराचे हप्ते असतात. परंतु वेळेवर पगार होत नसल्याने त्यांचे कर्जाचे हप्ते वाढत जातात. १२ ते १३ तारीख उलटूनही पगार होत नाहीत. त्यामुळे शिक्षकांना नेहमीच पगाराच्या प्रतीक्षेत बसावे लागते. वेळेवर पगार करण्याची अनेक दिवसांपासून मागणी आहे.
ममता ठाकूर, जिल्हाध्यक्ष,
महिला आघाडी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती, बुलडाणा.
सध्या दोन महिन्यांचे पगार झालेले नाहीत. त्यामुळे कोरोना महामारीच्या काळात शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १ तारखेला पगार करण्याची अनेक दिवसांची मागणी आहे. परंतु वेळेवर पगार होत नाहीत. १० ते १२ तारखेच्यानंतरच शिक्षकांचे पगार होतात. आता तर मार्चपासून पगार न झाल्याने शिक्षकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
सुनील मगर, विभागीय प्रसिद्धी प्रमुख,
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, बुलडाणा.