लसीकरणानंतर अँटिबॉडीज तपासणी करायची कशासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:22 AM2021-07-19T04:22:36+5:302021-07-19T04:22:36+5:30
जिल्ह्यातील लसीकरण पहिला डाेस ५३९५५८ दोन्ही डोस ७०५३३५ अँटिबॉडी तपासणीच्या प्रमाणात वाढ शहरात अँटिबॉडी तपासणीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून ...
जिल्ह्यातील लसीकरण
पहिला डाेस ५३९५५८
दोन्ही डोस ७०५३३५
अँटिबॉडी तपासणीच्या प्रमाणात वाढ
शहरात अँटिबॉडी तपासणीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. जिल्हा सामान्य रुग्णालयात अँटिबॉडीज तपासण्याची व्यवस्था नाही. मात्र बाहेर लॅबमध्ये अनेक युवक अशा प्रकारची तपासणी करताना दिसून येतात. लसीकरणानंतर दोन आठवड्यांनी शरीरात अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत का, याची तपासणी करण्यासाठी रोज किंवा एक दिवसाआड एक-दोन व्यक्ती येत असल्याची माहिती आहे.
तरुणांची संख्या जास्त
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर अँटिबॉडी तपासणीसाठी सर्वाधिक तरुणवर्ग पुढे येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातही अँटिबॉडी तपासणीविषयी विचारणा होते. काही जण तर केवळ उत्सुकतेपोटी या चाचण्या करीत आहेत. यामध्ये तरुणांचा समावेश अधिक आहे.
तपासणी करण्याची गरज आहे का?
कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर अँटिबॉडीज तपासणीची तशी कुठलीही गरज नाही. काही ठिकाणी यासंदर्भात सर्व्हे झालेला आहे. आपल्या जिल्ह्यात तसा सर्व्हे झालेला नाही, परंतु प्रत्येकाने लस घेणे हेच सध्या महत्त्वाचे आहे.
डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा