जुगार खेळण्यास पैसे न दिल्याने पत्नीला पेटविले
By admin | Published: October 5, 2014 12:46 AM2014-10-05T00:46:07+5:302014-10-05T01:03:21+5:30
जळीत पत्नीच्या जबाणीवरून गुन्हा दाखल; एक दिवसाची पोलिस कोठडी.
पिंपळगाव राजा (बुलडाणा): जुगार खेळण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून पत्नीला जीवे मारण्याचा उद्देशाने तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याची घटना २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता टाकळी तलाव येथे घडली. टाकळी तलाव येथील संजय बाबाराव बाबर (वय ४४) याने पत्नी लक्ष्मी (वय ३५) हिला जुगार खेळण्यासाठी पैशाची मागणी केली. लक्ष्मीने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संजय बाबर याचा राग अनावर झाला आणि त्याने पत्नी लक्ष्मी बाबर हिच्या अंगावर रॉकेल टाकून जीवे मारण्याच्या उद्देशाने पेटवून दिले. त्यामध्ये लक्ष्मी जखमी झाली. तिला उपचारार्थ खामगाव शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या मृत्यूपूर्व जबानीवरून पि. राजा पोलिसांनी संजय बाबाराव बाबर याच्याविरुद्ध कलम ३0७ भादंविप्रमाणे गुन्हा नोंदवून त्यास तत्काळ अटक केली. ३ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी संजय बाबर याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. संध्या लक्ष्मी बाबर ही मृत्यूशी झुंज देत असून, ितच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास ठाणेदार वंझारी करीत आहेत.