चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:46 AM2017-09-21T00:46:02+5:302017-09-21T00:46:38+5:30

बुलडाणा : तालुक्यातील खुपगाव येथील एकाने  संशयावरून आपल्या पत्नीचा खून केल्याची दुर्दैवी घटना १९  सप्टेंबर रोजी घडली. आरोपी समाधान गायकवाड याच्यावर कलम ३0२ प्रमाणे  गुन्हा दाखल करून त्याला पत्नीच्या खून प्रकरणात अटक  करण्यात आली आहे.

Wife's blood on character suspicion | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

Next
ठळक मुद्देखुपगाव येथील घटनाआरोपी समाधान गायकवाडला अटक; गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : तालुक्यातील खुपगाव येथील एकाने  संशयावरून आपल्या पत्नीचा खून केल्याची दुर्दैवी घटना १९  सप्टेंबर रोजी घडली. आरोपी समाधान गायकवाड याच्यावर कलम ३0२ प्रमाणे  गुन्हा दाखल करून त्याला पत्नीच्या खून प्रकरणात अटक  करण्यात आली आहे.
बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहि तीनुसार, सहा वर्षांपूर्वी समाधान अशोक गायकवाड आणि  यशदा यांचे लग्न झाले होते. त्यांना तीन वर्षांचा मोठा आणि  दोन वर्षांचा छोटा मुलगाही आहे. मागील काही महिन्यांपासून  समाधान पत्नीवर संशय घेत होता. यातून दोघांमध्ये भांडण  व्हायचे. काल झालेले भांडण मात्र शेवटचे ठरले. दुपारी १  वाजेच्या सुमारास आरोपी समाधान याने रागाच्या भरात हाता त लोखंडी रॉड घेऊन यशदाच्या डोक्यात मारला. तिला  वाचविण्यासाठी त्यांची नातेवाईक योगेश्‍वरी गायकवाड मध्ये  पडली; पण तिलाही आरोपीने रॉड मारला. त्यात ती जखमी  झाली. रक्तबंबाळ अवस्थेत यशदाला गावातील पोलीस  पाटील आणि काही गावकर्‍यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल  केले. 
 मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने तिला अकोला  रुग्णालयात रवाना करण्यात आले. मात्र वाटेतच तिचा मृत्यू  झाला. पोलिसांनी या प्रकरणात दुपारी कलम ३0७ प्रमाणे  आरोपी पती समाधानवर गुन्हा नोंदविला होता; पण  संध्याकाळी ७ वाजेदरम्यान यशदाच्या मृत्युची बातमी  मिळाल्यामुळे या प्रकरणात कलम ३0२ प्रमाणे गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. खुपगावचे पोलीस पाटील विदुर तु पकर यांनी प्रकरणाची फिर्याद दिली आहे. तपास ठाणेदार ए पीआय अमित वानखेडे करीत आहेत. 

Web Title: Wife's blood on character suspicion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.