रोजगार सेवकाच्या आत्महत्याप्रकरणी पत्नीची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:36 AM2021-07-30T04:36:23+5:302021-07-30T04:36:23+5:30
चिखली तालुक्यातील ग्राम कव्हळा येथील रोजगार सेवकाने २७ जुलै रोजी सकाळी बाथरूममध्ये आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. ...
चिखली तालुक्यातील ग्राम कव्हळा येथील रोजगार सेवकाने २७ जुलै रोजी सकाळी बाथरूममध्ये आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. याबाबत अमडापूर पोलीस स्टेशनला मृत रामेश्वर ढोरे यांची पत्नी संगीता रामेश्वर ढोरे (वय ३२ वर्ष रा. कव्हळा) यांनी तक्रार दिली आहे. रामेश्वर ढोरे हे रोजगार सेवक म्हणून कार्यरत होते. या कामावर असताना त्यांनी घरातल्या बाथरूममध्ये २७ जुलै रोजी रात्री दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली. तहसील कार्यालय रोजगार हमी योजना कक्ष चिखलीमधील डाटा ऑपरेटर यांनी माझे पती रामेश्वर ढोरे यांना नेहमी अपमानास्पद वागणूक दिली व मस्टरवर सही करा, नाहीतर तुमचा रिपोर्ट करते अशा धमकीला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची तक्रार संगीता ढोरे यांनी २९ जुलै रोजी केली आहे. याबाबत ठाणेदार नागेश चतरकर यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी या तक्रारीवर चौकशीअंती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.